Home » सांगितले आमदार निवास, पण आमदार देशमुखांना नेले अकोल्याला

सांगितले आमदार निवास, पण आमदार देशमुखांना नेले अकोल्याला

by नवस्वराज
0 comment

नागपूर : जलसंघर्ष यात्रा घेऊन अकोल्यावरून पायी आलेल्या बाळापूरचे आमदार नितीन देशमुख यांना पोलिसांनी वाहनात कोंबल्यानंतर थेट अकोल्याचा रस्ता धरलाय. नागपूरच्या आमदार निवासात नेत असल्याचे सांगत पोलिसांनी आमदार देशमुख यांना उचलण्याचा प्रयत्न केला.

आमदार देशमुख यांना यावेळी पोलिसांनी समजावण्याचा प्रयत्न केला. मात्र तब्बल चाळीच अंश सेल्सिअस तापमानात आमदार देशमुख व त्यांचे सहकारी रस्त्यावर झोपले. त्यामुळे पोलिसांची रस्त्यावर झोपलेल्या आमदार देशमुख यांना फरफटत नेते. काहींनी त्यांचे हातपाय धरले तर काहींनी त्यांना उचलण्याचा प्रयत्न केला. आमदार देशमुख यांचे कार्यकर्ते त्यांना पोलिसांच्या तावडीतून सोडविण्याचा प्रयत्न करीत होत्या. त्यामुळे वरिष्ठ पोलिस निरीक्षक अशोक बागुल यांच्यासह दहा पोलिसांनी आमदार देशमुख यांना गराडा घातला व उचलून वाहनात कोंबले. यावेळी सुमारे पन्नासवर पोलिस कार्यकर्त्यांना पिटाळण्यासाठी पुढे सरसावले.

पोलिस, आमदार नितीन देशमुख आणि उद्धव ठाकरे गटाचे कार्यकर्ते यांच्यात यावेळी चांगलीच झटापट झाली. आपल्याला ताब्यात घेऊन आमदार निवासात नेत आहोत असे पोलिसांनी यावेळी सांगितले. पोलिसांचे वाहन काही अंतरावर सायरन वाजवत गेल्यानंतर आधी ठरलेल्या ‘रणनीती’नुसार सर्व पोलिस वाहने अमरावती रोडवरून अकोल्याकडे वळविण्यात आली. काही कळण्यापूर्वी किंवा आंदोलक पळुन जाण्यापूर्वीच नागपूर शहर पोलिसांच्या वाहनांनी शहराची हद्द ओलांडत नागपूर ग्रामीण पोलिसांच्या हद्दीत प्रवेश केला होता.

तुम्हाला देखील आवडेल

error: Content is protected !!