नागपूर : ‘मला काहीही झालेले नाही. गुजरात पोलिसांनी मला जबरदस्ती रुग्णालयात नेले. तेथे 20 ते 25 लोकांनी धरून ठेवत मला इंजेक्शन टोचले. मला हार्ट अटॅक आला नाही’, असा खळबळजनक आरोप बाळापूरचे शिवसेना आमदार नितीन देशमुख यांनी केला.
सूरत येथून नागपुरात परतल्यानंतर त्यांना प्रसार माध्यमांसमोर हा आरोप केला. आपल्याला जबरदस्तीने नेण्यात आले होते. आता नागपुरात परतल्यानंतर आपण थेट बाळापूर येथे आपल्या घरी जात असल्याचे देशमुख यांनी स्पष्ट केले. ‘मी बाळासाहेब ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांचा सच्चा शिवसैनिक आहे. मी शिवसेना सोडणार नाही’, असे देशमुख यांनी ठासून सांगितले.