Home » आमदार देवेंद्र भुयार म्हणतात, मी राष्ट्रवादीसोबतच

आमदार देवेंद्र भुयार म्हणतात, मी राष्ट्रवादीसोबतच

by Navswaraj
0 comment

नागपूर : मी राष्ट्रवादी काँग्रेस सोबत असून विधान परिषद निवडणुकीत महाविकास आघाडीलाच मतदान करणार आहे, असे मत मोर्शीचे अपक्ष आमदार देवेंद्र भुयार यांनी व्यक्त केले. ते नागपूर येथे पत्रकारांशी बोलत होते. काँग्रेसकडून संपर्क झालेला नाही, असेही त्यांनी सांगितले.

भाजपने मला संपर्क केला नाही. मी अजित पवार यांच्यासोबत आहे याची त्यांना कल्पना आहे. इतर अपक्षही आघाडीच्या संपर्कात आहेत. मी आताही मुख्यमंत्र्यांना वेळ मागितला आहे, पण अजूनही दिलेला नाही, असेही आमदार भुयार यांनी नमूद केले.

error: Content is protected !!