Home » सत्तेसाठीची चढाओढ आणि आमदार भोयर यांचा साक्षगंध

सत्तेसाठीची चढाओढ आणि आमदार भोयर यांचा साक्षगंध

by नवस्वराज
0 comment

अमरावती  : महाराष्ट्रात सध्या सत्ता संघर्षावरून घमासान चालू आहे मात्र एक आमदार असेही आहेत ज्यांना या सत्ता संघर्षाचे सध्यातरी काही घेणेदेणे नाही. ते सध्या परिवारातील सदस्यांसोबत व्यस्त आहेत आणि आपल्या भावी जीवनसंगिनीसह सुद्धा. हे आमदार आहेत मोर्शीचे देवेंद्र भुयार.

आमदार देवेंद्र भुयार यांनी एका कौटुंबिक सोहळ्यात साखरपुडा आटोपला. लवकरच ते विवाह बंधनात अडकणार आहेत. पूर्वी शेतकरी संघटनेत दहा वर्ष काम करणारे देवेंद्र भुयार यांनी मोर्शी मतदारसंघातून कृषी मंत्री असणारे डॉ. अनिल बोंडे यांचा पराभव करून मोठा विजय मिळवला होता. कृषिमंत्र्यांचा पराभव करून आमदार झालेल्या देवेंद्र भुयार यांची संपूर्ण महाराष्ट्रात ओळख निर्माण झाली होती. आमदार झाल्यावर शेतकरी संघटनेत मतभेत झाल्याने ते राष्ट्रवादी काँग्रेससोबत आलेत.

विधान परिषद निवडणुकीत त्यांच्या मतदानाबाबत शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत यांनी आक्षेप व्यक्त केला असताना मी पवारांशी प्रामाणिक आहे असे म्हणत देवेंद्र भुयार यांनी खासदार संजय राऊत यांना देखील सडेतोड उत्तर दिले होते. त्यानंतर राज्यात राजकीय अस्थिरता निर्माण झाली. असे असले तरी भुयार यांचे नवजीवन लवकरच सुरू होणार आहे.

तुम्हाला देखील आवडेल

error: Content is protected !!