Home » मंत्रिपद न मिळालेल्या ‘बच्चूभाऊं’चा मूड अद्यापही ‘कडू’च

मंत्रिपद न मिळालेल्या ‘बच्चूभाऊं’चा मूड अद्यापही ‘कडू’च

by Navswaraj
0 comment

अमरावती : मंत्रीपद न मिळाल्याने प्रहार पक्षाचे आमदार बच्चू कडू यांनी पुन्हा नाराजी व्यक्त केली आहे. तीन महिन्यापूर्वी महाविकास आघाडीची सत्ता उलथावत आमदार कडू एकनाथ शिंदे यांच्यासोबत गेले होते. त्यांना सामाजिक न्याय विभागाचे मंत्रिपद हवे आहे.

एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेतून वेगळी चूल मांडल्यानंतर बच्चू कडू हे अगदी सुरुवातीपासून त्यांच्या सोबत होते, मात्र बच्चू कडू यांना मंत्रिमंडळ स्थान मिळालेले नाही. पहिल्या टप्प्यात मंत्रिमंडळात स्थान न मिळाल्याने आमदार कडू नाराज आहेत. मंत्रिमंडळ विस्तारात स्थान मिळेल का, यावर विचारले असता ते म्हणाले, “आमचा प्रहार पक्ष शिंदे -भाजप सरकारमध्ये लहानसा पक्ष आहे, आता मंत्रिमंडळ मंत्रीपद मिळाले नाही तर अडीच वर्षानंतर मिळेल.” अतीवृष्टी आणि त्यानंतर शेतकऱ्यांना मिळालेली मदत यासंदर्भात कडू म्हणाले, “तुम्ही पाहात नसाल, तर माझ्यासोबत चला. शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झालेले पैसे दाखवतो. दोन दिवस आधीच शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा झाले आहेत.”

तुम्हाला देखील आवडेल

error: Content is protected !!