Home » संविधानाचा खून करणारे त्यावर बोलू शकत नाही : आ. मिटकरी

संविधानाचा खून करणारे त्यावर बोलू शकत नाही : आ. मिटकरी

by Navswaraj
0 comment

अकोला : “नवणीत राणा आणि संविधानाचा काय संबंध आला? मातोश्रीवर जाऊन हनुमान चालिसा म्हणण्याचा अट्टहास करणाऱ्या रवी राणा आणि नवणीत राणा यांना संविधान कधीपासून कळायला लागले? संविधानाचा खून करणारी ही लोकं आहेत. संविधानावर त्यांनी बोलू नये”, अशी सडेतोड टीका आ. अमोल मिटकरी यांनी केली.

एका खासगी वृत्तवाहिनीशी बोलताना आ. मिटकरी यांनी महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणी करणाऱ्या खा. नवनीत राणा यांचा समाचार घेतला.  संविधान अनुच्छेद दोन आणि चारनुसारच भारतीय जनता पार्टीचे सरकार बनू शकत नाही. इथे फ्लोअर टेस्ट करावी लागेल. इथे संविधानाने तुमच्यामध्ये आडकाठी आणली आहे, असे मिटकरी यांनी स्पष्ट केले.

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला अपेक्षित असणारं सरकार महाराष्ट्रात स्थापन होऊ नये यासाठी भारतीय लोकशाहीला धरून महाविकास आघाडी सरकार स्थापन करेन. नवणीत राणा आता संविधान बोलतात आणि विधान परिषदेचे आमदार हनुमान चालिसाच्या भरोशावर निवडून आले असे म्हणतात. एका म्यानामध्ये दोन तलवारी घालणाऱ्या बेगडी लोकांकडून संविधानाच्या बाबतीत आदरयुक्त शब्द म्हणजे नथुराम गोडसेच्या तोंडी महात्मा गांधी यांचा जयजयकार करण्याचा प्रकार आहे, असेही मिटकरी यांनी स्पष्ट केले.

तुम्हाला देखील आवडेल

error: Content is protected !!