Home » भाजपाच्या अध:पतनाला सुरुवात : अमोल मिटकरी

भाजपाच्या अध:पतनाला सुरुवात : अमोल मिटकरी

by Navswaraj
0 comment

मुंबई : शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यामध्ये मतभेद निर्माण झाल्याच्या चर्चा सुरू झाल्या असताना त्यावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी भाजपाच्या अध:पतनाचा इशारा दिला आहे.


राज्यसभा निवडणुकीसाठी सर्वच पक्षांकडून गटागटाने आमदार विधानभवनात येऊन मतदान करत आहेत. त्यात राष्ट्रवादी काँग्रेसने आपल्या मतांचा कोटा ४२ वरून ४४ केल्याची चर्चा सुरू झाली होती. मात्र, शिवसेनेच्या नाराजीनंतर त्यांनी पुन्हा निर्णय बदलून तो ४२ केल्याचं देखील सांगितलं जात होतं. या पार्श्वभूमीवर सत्ताधारी महाविकास आघाडीत बिघाडी झाल्याची शक्यता वर्तवली जाऊ लागली होती. मात्र, यावर बोलताना अमोल मिटकरींनी पक्षाची भूमिका स्पष्टपणे मांडली आहे. २४ वर्षांनंतर राज्यात पुन्हा राज्यसभेची निवडणूक होत आहे.

error: Content is protected !!