Home » तुकोबा आणि वारकरी यांच्यापेक्षा मोदी मोठे झाले का : अमोल मिटकरी

तुकोबा आणि वारकरी यांच्यापेक्षा मोदी मोठे झाले का : अमोल मिटकरी

by Navswaraj
0 comment

अकोला : फ्लेक्सवर पंढरपूरच्या पांडुरंगापेक्षा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा फोटो मोठा दाखवण्यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी तीव्र आक्षेप घेतला आहे. पिंपरी चिंचवड येथे भाजपाने मोदींचा फोटो पांडुरंगापेक्षा जाणीवपूर्वक मोठा दाखवून वारकरी संप्रदायाचा अवमान केला असल्याचा आरोप त्यांनी केला.

भाजपचे हे कृत्य म्हणजे पांडुरंग, तुकाराम महाराज आणि वारकरी संप्रदाय यांचा अपमान असल्याचा आरोप मिटकरी यांनी केला आहे. मोदींच्या तुकोबरायांच्या वेशातील फोटोवरही आक्षेप घेतला. भारतीय जनता पार्टीने नाटक सुरू केले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा एक फोटो जगदगुरू संत तुकोबारायांच्या वेशात दाखवण्यात येत आहे. त्यातून तुकोबारायांचा फार मोठा अपमान केला आहे, असे ते अकोल्यातील एक खासगी वाहिनीशी बोलताना म्हणाले. नरेंद्र मोदी निश्चित मोठे आहेत, पण ते पांडुरंगापेक्षा मोठे असू शकत नाही हा माझा वारकरी म्हणून विश्वास आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.

error: Content is protected !!