Home » Akola Rape : सिगारेटचे चटके देत अल्पवयीन मुलीवर बलात्कार, मुंडनही केले

Akola Rape : सिगारेटचे चटके देत अल्पवयीन मुलीवर बलात्कार, मुंडनही केले

by Navswaraj
0 comment

अकोला | Akola : खदान पोलिस स्टेशनअंतर्गत येणाऱ्या कैलास टेकडी भागात २९ वर्षीय तरुणाने १४ वर्षीय बालिकेवर बलात्कार केला. शरीरावर अनेक ठिकाणी सिगारेटचे चटके युवकानं ब्लेडने तिचे केसही कापले. सलूनमध्ये नेत तिचे मुंडन करायला लावले. परिसरातील स्मशानभूमीजवळ नेत पुन्हा बालिकेला सर्वांसमक्ष विवस्त्र करीत बलात्काराचा प्रयत्न केला. गणेश कुंभरे (वय २९) हे आरोपीचे नाव असल्याचे पोलिसांनी सांगितले. (Minor Girl Raped and Tortured In Kailas Tekdi Area Of Akola)

पीडित मुलीचे पालक मजुरी करतात. गणेशने पीडित मुलीला १५ नोव्हेंबरला मारहाण करीत आपल्या घरी नेले. तिच्यावर बलात्कार केला. मुलीने विरोध केल्याने त्याने तिच्या शरीरावर अनेक ठिकाणी सिगारेटचे चटके दिले. ब्लेडने तिचे केसही कापले. कुणाला कळेल या भीतीनं गणेशने पीडितेला सिंधी कॅम्पमधील एका सलूनमध्ये नेले. तिथे तिचे मु्ंडन करून घेतले. त्यानंतर गणेशने तिला पुन्हा परिसरातील स्मशानभूमीजवळ आणलं व सार्वजनिक ठिकाणी विवस्त्र करीत तिच्यावर बळजबरी करण्याचा प्रयत्न केला. या वेळी परिसरातील चार युवकांनी गणेशला रोखण्याचा प्रयत्न केला. त्यांनी आरडाओरड केल्यानं गणेश पळुन गेला.

घरी परतल्यावर तिच्या पालकांनी तिला या प्रकाराबद्दल विचारणा केली. मात्र गणेश परिवाराला मारून टाकेल, या दहशतीने ती दोन दिवस भीतीपोटी रडत होती. अखेर पालकांनी तिला विश्वासात घेतल्यानंतर तिने घडलेला प्रकार सांगितला. मुलींच्या पालकांनी तातडीनं खदान पोलिस स्टेशन गाठत गणेशविरुद्ध तक्रार दाखल केली. घटनेबाबत माहिती मिळाल्यानंतर अरुधती शिरसाट, प्रभा शिरसाट, जिल्हा परिषद सदस्य पुष्पा इंगळे, जिल्हा परिषद समाज कल्याण सभापती आम्रपाली खंडारे, वंदना वासनिक, आशिष मांगुळकर, सचिन शिराळे यांनी खदान पोलिस ठाण्यात पोहोचत आंदोलन केले.

तुम्हाला देखील आवडेल

error: Content is protected !!