Home » Weather Update: हवामान विभागाचा राज्यातील ५ जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट

Weather Update: हवामान विभागाचा राज्यातील ५ जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट

Yellow Alert : बहुतांशी भागांमध्ये काही ठिकाणी येलो अलर्ट, वादळाची शक्यता

by नवस्वराज
0 comment

Maharashtra/ Vidhrbh : राज्यातील वेगवेगळ्या भागात मागील तीन दिवसांपासून पाऊस पडत आहे. तर काही ठिकाणी गारपीटही होत आहे. हवामान विभागाने राज्यातील 5 जिल्ह्यांना पावसाचा ऑरेंज अलर्ट दिला. तर बहुतांशी भागांमध्ये काही ठिकाणी येलो अलर्ट दिला.  नागपुरात आज सकाळ पासूनच हवेत गारवा जाणवत आहे, तर पावसाची शक्यता आहे.हवामान विभागाने राज्यात ठिकठिकाणी पावसाचा आज आणि उद्या अंदाज दिला. नाशिक, धुळे, जळगाव, छत्रपती संभाजीनगर आणि जालना या जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी विजा, ढगांच्या तसेच जोरदार वाऱ्यासह पावसाचा आणि गारपिटीचा ऑरेंज अलर्ट हवामान विभागाने दिला.

तर विदर्भातील बुलडाणा, अकोला, अमरावती आणि नागपूर तर मराठवाड्यातील बीड, परभणी आणि हिंगोली तसेच मध्य महाराष्ट्रातील नगर आणि पुणे जिल्ह्याला काही ठिकाणी विजा आणि ढगांच्या गडगडाटासह हलक्या पावसाचा अंदाज हवामान विभागाने दिला.कोकणातील पालघर, ठाणे, मुंबई, रायगड जिल्ह्यात काही ठिकाणी विजा आणि ढगांच्या गडगडाटासह हलक्या पावसाचा अंदाज हवामान विभागाने दिला. तर वाशिम आणि यवतमाळ जिल्ह्यात काही ठिकाणी हलक्या सरी पडतील, असाही अंदाज हवामान विभागाने दिला.शनिवारी राज्यातील बहुतांशी जिल्ह्यांमध्ये ठिकठिकाणी पावसाचा अंदाज आहे. मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, बीड, जालना, परभणी, हिंगोली आणि नांदेड तसेच विदर्भातील अकोला, अमरावती, वर्धा, नागपूर, भंडारा आणि गोंदिया तसेच खानदेशातील जळगाव आणि धुळे जिल्ह्यात काही ठिकाणी विजा आणि ढगांच्या गडगडाटासह हलक्या पावसाचा अंदाज हवामान विभागाने दिला.

कोकणातील पालघर, ठाणे, मुंबई, रायगड आणि नंदुरबार, नाशिक, नगर, पुणे जिल्ह्यात काही ठिकाणी विजा आणि ढगांच्या गडगडाटासह हलक्या पावसाचा अंदाज हवामान विभागाने दिला. तर वाशीम आणि यवतमाळ जिल्ह्यात काही ठिकाणी हलक्या सरी पडतील, असाही अंदाज हवामान विभागाने दिला.

तुम्हाला देखील आवडेल

error: Content is protected !!