Home » शिवसंग्रामचे नेते, विश्व हिंदू परिषदेचे पदाधिकाऱ्यांनी शिंदे गटात

शिवसंग्रामचे नेते, विश्व हिंदू परिषदेचे पदाधिकाऱ्यांनी शिंदे गटात

by नवस्वराज
0 comment

अकोला : विनायकराव मेटे यांच्या शिवसंग्राम पक्षातील प्रदेश उपाध्यक्ष संदीप पाटील व त्यांच्या कार्यकर्त्यांनी शिंदे गटामध्ये प्रवेश केला. त्यांच्यासोबत विश्व हिंदू परिषदेचे नेते गोपाल नागापुरे यांनी ही त्यांच्या कार्यकर्त्यांसोबत प्रवेश केला आहे. शासकीय विश्रामगृह येथे जिल्हा संघटक माजी आमदार गोपिकीशन बाजोरिया यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम झाला.

शिंदे गटात पक्षप्रवेश झाल्यानंतर या पदाधिकाऱ्यांना कोणती जबाबदारी द्यायची आहे, हे अद्याप निश्चित झालेले नाही. त्यांना समिती निर्णय घेऊन योग्य ते पद देईल, असे माजी आमदार व शिंदे गटाचे जिल्हा संघटक गोपीकिशन बाजोरिया यांनी आपल्या भाषणात सांगितले. जिल्हाध्यक्ष विठ्ठल सरप, अश्विन नवले, शहराध्यक्ष योगेश अग्रवाल यांच्यासह इतर पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

तुम्हाला देखील आवडेल

error: Content is protected !!