Home » मेहकर-खामगाव बसला अपघात; २५ प्रवासी जखमी

मेहकर-खामगाव बसला अपघात; २५ प्रवासी जखमी

by नवस्वराज
0 comment

बुलडाणा : एसटी बसला झालेल्या अपघातात चालक वाहकासह किमान पंचवीस प्रवासी जखमी झालेत. मेहकर येथून खामगावकडे ही बस चालली होती. जखमींमध्ये बुलढाण्यासह अकोला व वाशीम जिल्ह्यातील राहिवासीयांचा समावेश आहे. जखमींना मेहकर येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. जखमीपैकी काहींची प्रकृती गंभीर आहे.

शनिवार, ४ फेब्रुवारी २०२३ रोजी दुपारी दीड वाजताच्या सुमारास एसटी महामंडळाची बस मेहकरवरून खामगावकडे निघाली. पाथर्डी घाटात बसचे स्टेअरिंग निकामी झाले. त्यामुळे बस घाटातील झाडावर आदळली. बसचा वेग जास्त असल्याने या धडकेत चालक आणि वाहकासह २५ प्रवासी जखमी झालेत. जखमींची संख्या जास्त असल्याने गोंधळ निर्माण झाला होता. घटनेची माहिती मिळताच जानेफळ पोलिस ठाण्याचे ठाणेदार राहुल बोंदे सहकाऱ्यांसह अपघातस्थळी दाखल झालेत. त्यांनी नागरिकांच्या मदतीने जखमींना इस्पितळाकडे रवाना केले. घटनास्थळी एसटी महामंडळाचे कार्यशाळा अधीक्षक हर्षल साबळे, खामगाव आगार व्यवस्थापक रणवीर कोळते, तसेच प्रवीण तांगडे, संजय मापारी, अंकित शिंदे यांनी भेट देऊन बसची पाहणी केली.

जखमींमध्ये चालक विवेक काळे आणि वाहक बाळु गव्हाणे यांच्यासह कांताबाई अवचार, सुरेश जनार्दन खराटे, प्रयागबाई जनार्दन खराटे, शेख यासीन शेख खुबन, अब्दुल रशीद अब्दुल कादिर, मनोरमा गबाजी मिसाळ, रोहिणी घनश्याम जाधव, ऋतुजा जीवन जाधव, शंकर रामा कांबळे, सीताराम नानू चव्हाण, प्रीती बुढन मार्कंड, भावेश मूलचंद राठोड, हरिभाऊ त्रंबक सोळंके, अनुसया हरिभाऊ सोळंके, कविता गोपाल एकनाथ, स्नेहा केवलसिंग चव्हाण, किरण मुरलीधर राठोड, अश्विनी कैलास राठोड, रेखा प्रकाश चव्हाण, वेदिका सुरेश जाधव, कोमल रोहिदास राठोड, राणी नवलचंद जाधव, सोनू संतोष जाधव यांचा समावेश आहे.

तुम्हाला देखील आवडेल

error: Content is protected !!