Home » पोलिसांच्या आवाहनानंतरही अकोल्यात ऑटो चालकांची मनमानी

पोलिसांच्या आवाहनानंतरही अकोल्यात ऑटो चालकांची मनमानी

by नवस्वराज
0 comment

अकोला : वाहतूक नियमांचे काटेकोर पालन करण्याबाबत शहर पोलीस उपाधीक्षक सुभाष दुधगावकर यांच्या उपस्थितीत ऑटोचालकांची बैठक घेण्यात आली होती. या बैठकीत पोलिसांनी दिलेल्या सूचनांकडे दुर्लक्ष करीत अकोला शहरातील ऑटो चालकांनी आपली मनमानी सुरूच ठेवली आहे.

ऑटो चालवताना गणवेश, बॅच, बिल्ला याचा वापर करावा, सर्वसामान्य नागरिकांना कोणताही त्रास होऊ नये याकरिता काळजी घ्यावी, शहरातील प्रमुख चौकातील सिग्नलच्या नियमांचे पालन करावे, नियमानुसार ऑटो हा दिलेल्या पार्किंगच्या ठिकाणीच उभा करावा, ऑटो चालकांनी ऑटो चालविताना वाहना संदर्भात संपूर्ण कागदपत्र सोबत ठेवावे, अवैध प्रवासी वाहतूक करू नये, ऑटोच्या इंधनात भेसळ करू नये, प्रवासी घेण्यासाठी बस स्टॅन्ड , रेल्वे स्टेशनमध्ये जाऊन आरडाओरड करू नये अशा सूचना उपअधीक्षक दुधगावकर यांनी केल्या होत्या. मात्र डीवायएसपींच्या सूचनेकडे सर्वात दुर्लक्ष करून अनेक ऑटो चालकांनी वाहतूक नियमांची पायमल्ली कायम ठेवली आहे. रेल्वे स्टेशन, बस स्थानक चौकातील बेशिस्त पार्किंग अजूनही नागरिकांसाठी डोकेदुखी ठरत आहे. अनेक मार्गावर अद्यापही फ्रंटसीट वाहतूक सुरूच आहे. त्यामुळे बहुतांश ऑटो चालक वाहतूक नियमां बद्दल किती सतर्क आहेत, याची प्रचिती येते. त्यामुळे विविध ऑटो चालक संघटनांमधील समजदार पदाधिकाऱ्यांनी पुढाकार घेण्याची गरज आहे.

तुम्हाला देखील आवडेल

error: Content is protected !!