Home » Mumbai News : लष्कर-ए-तैय्यबा अतिरेकी साजिद मीर व्हेंटिलेटरवर

Mumbai News : लष्कर-ए-तैय्यबा अतिरेकी साजिद मीर व्हेंटिलेटरवर

by नवस्वराज
0 comment

Mumbai | मुंबई : लष्कर – ए-तैय्यबा या अतिरेकी संघटनेचा फाॅरेन रिक्रूटर, अमेरिकन दहशतवादी डेव्हिड डॅडलीचा मुख्य हॅन्डलर तसेच 26/11च्या मुंबई दहशतवादी हल्ल्याचा मुख्य सूत्रधार साजिद मीर याच्यावर पाकिस्तानात विषप्रयोग करण्यात आला आहे. तो सद्या व्हेंटिलेटरवर असल्याची माहिती समोर येत आहे. त्याच्यावर सीएमएच इन्स्टिटयूट ऑफ मेडिकल सायंसेस बहावलपूर येथे उपचार सुरू आहेत. (Mastermind Of 26/11 Mumbai Terrorist Attack Sajid Mir Is On Life Support System Due To Poisoning)

 

पाकिस्तानातील तुरूंगात ही घटना घडली आहे. मात्र यातील तथ्याची पुष्टी झालेली नाही. 26/11च्या मुंबई दहशतवादी हल्ल्यात शेकडो निष्पाप लोकांनी जीव गमावला अनेकांना कायमचे अपंगत्व आले. लष्करचा प्रमुख कमांडर साजिद मीरने हाफिज सईदसह दहशतवादी हल्ल्याची तयारी केली होती. हल्ल्यादरम्यान साजिद हा अजमल कसाब आणी ईतर अतिरेक्यांना पाकिस्तानातून आदेश देत होता.

अमेरिकेच्या एफबीआयने साजिद मीरवर 5 कोटी डाॅलरचे बक्षीस जाहीर केले आहे. टेरर फंडींग प्रकरणी त्याला 8 वर्षाची शिक्षा देखील सुनावण्यात आली आहे. पाकिस्तानच्या न्यायालयाने गेल्या वर्षी त्याला 15 वर्षाची शिक्षा ठोठावली आहे. भारत आणि अमेरिकेने 2023 च्या सुरूवातीला साजिद मीरला जागतिक दहशतवादी घोषीत करण्याचा प्रस्ताव सादर केला होता. मात्र काही देशांनी यात आडकाठी आणली. मीरला जागतिक दहशतवादी घोषीत केल्यास त्याची संपत्ती जप्त केली जाईल, त्याच्या जगभरातील प्रवासावर बंदी घालण्यात येऊन अनेक कडक निर्बंध लादण्यात येतील.

तुम्हाला देखील आवडेल

error: Content is protected !!