Home » दोन शिवसेनेतील वादाला जातीयतेचा रंग देण्याचा प्रयत्न

दोन शिवसेनेतील वादाला जातीयतेचा रंग देण्याचा प्रयत्न

by Navswaraj
0 comment

बुलडाणा : बाजार समितीच्या सत्कार कार्यक्रमादरम्यान दोन शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांमध्ये झालेल्या राजकीय हाणामारीला जातीय रंग देण्याचा प्रयत्न सुरू झाल्याची चर्चा बुलडाणा जिल्ह्यात रंगली आहे.

बाजार समितीतील शिवसेनेच्या कार्यक्रमात शिंदे गटाने केलेल्या हल्ल्याचे पडसाद बुलडाणा जिल्ह्यात उमटले. सिंदखेडराजात निषेध मोर्चा काढण्यात आला. जिल्ह्यातील अन्य १२ तालुकास्थळीदेखील या हल्ल्याचा निषेध करण्यात आला. परंतु निषेध मोर्चादरम्यान समाजविषयक बॅनर हाती धरण्यात आल्याने राजकीय वादाला जातीयतेची किनार देण्याचा प्रयत्न सुरू झाल्याचे मत अनेकांनी व्यक्त केले.

३ सप्टेंबरला बुलडाण्यात बाजार समितीत पार पडलेल्या शिवसेनेच्या सत्कार समारंभात शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांनी खुर्च्यांची फेकाफेक केली असा आरोप आहे. शिवसेना पदाधिकाऱ्यांना यावेळी जबर धक्काबुक्की व मारहाणही करण्यात आली. या घटनेचे पडसाद जिल्ह्यात उमटत आहेत. शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी याबाबत ईशारा दिल्यानंतर शिवसेनेची ताकद असणाऱ्या सिंदखेडराजामध्ये सोमवार, ५ सप्टेंबर २०२२ रोजी सकाळी ११ वाजता निषेध मोर्चा काढण्यात आला. मोर्चात सहभागी नेत्यांनी तहसीलदारांमार्फत राज्यपालांना निवेदन पाठविले.

शिवसेनेचे ज्येष्ठ नेते छगन मेहेत्रे यांच्या नेतृत्वाखालील या मोर्चात योगेश म्हस्के, संदीप मेहेत्रे, विष्णू ठाकरे, अशोक मेहेत्रे, बबन मेहेत्रे यांच्यासह पदाधिकारी व शिवसैनिक मोठ्या संख्येने सहभागी झाले. ‘हल्लेखोरांना अटक करा..’, ‘माळी समाजाबद्दल अपमानास्पद शब्द वापरणाऱ्याविरुद्ध कारवाई करा..’, ‘बुलढाणा ठाणेदाराविरुद्ध कारवाई करा..’ आदी घोषणा यावेळी देण्यात आल्या.

तुम्हाला देखील आवडेल

error: Content is protected !!