Home » मराठा समाजाने आता आंदोलन मागे घ्यावे : बच्चू कडू

मराठा समाजाने आता आंदोलन मागे घ्यावे : बच्चू कडू

by Navswaraj
0 comment

नंदुरबार : राज्यात मराठा समाजाला आरक्षण मिळावा या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील हे आंदोलन करत असून सरकारकडून आरक्षणाची घोषणा करण्यात आली आहे. तरी देखील त्यांनी उपोषण मागे घेतलं नाही. हे आंदोलन आता मागे घेतलं गेलं पाहिजे. खुद्द मुख्यमंत्री अतिशय पॉझिटिव्ह पद्धतीने आरक्षणाचा विचार करत आहेत, अशी प्रतिक्रिया आमदार व प्रहारचे नेते बच्चू कडू यांनी दिली आहे.

कुणबी हा मराठा आहे आणि मराठा हाच कुणबी आहे. आम्ही देखील मराठा आहोत. मराठा हे नाव एका जातीचे नव्हे, धर्माचे नाही, पंथाचे नाही. संपूर्ण महाराष्ट्र मुलुखाचे आहे. महाराष्ट्रात जे जे राहतात ते सर्व मराठे आहेत. चुकून त्यांनी मराठा लिहिले. त्यामुळे त्यांना आरक्षण मिळालं नाही. मात्र आता आंदोलन हे मागे घेतले पाहिजे अशी इच्छा बच्चू कडू यांनी व्यक्त केली.

तुम्हाला देखील आवडेल

error: Content is protected !!