Home » मराठा व्यवसाय संघाचा विदर्भस्तरीय मेळावा

मराठा व्यवसाय संघाचा विदर्भस्तरीय मेळावा

by Navswaraj
0 comment

अकोला : येथील डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ परिसरातील कृषक भवन येथे मराठा व्यवसाय संघाद्वारे आयोजित विदर्भस्तरीय व्यावसयिक मेळावा संपन्न झाला.

मेळाव्यास प्रभात किड्सचे संचालक गजानन नारे, अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचे जिल्हा समन्वयक रोहित बावस्कर, रुरल चेंबर ऑफ कॉमर्सचे अकोला जिल्हाध्यक्ष अक्षय ठोकळ, एमसीईडीचे कार्यक्रम अधिकारी नेत्रदीप चौधरी, फ्रिलान्स ट्रेनर विजय देशमुख तसेच मराठा व्यवसाय संघ मुंबईची चमू उपस्थिती होती.

कार्यक्रमाची सुरुवात शिवपूजनाने झाली. प्रस्तावना सेवानिवृत सैन्य अधिकारी प्रकाश देशमुख यांनी केली. प्रस्तावनेत त्यांनी मराठा व्यवसाय संघाचा उद्देश्य व कार्यप्रणाली बाबत विवेचन केले. अकोलाच्या मराठा व्यवसाय संघ वाटचालीची माहिती जिल्हाध्यक्ष प्रसाद देशमुख यांनी दिली. कार्यक्रमात मार्गदर्शन करताना गजानन नारे यांनी शैक्षणिक क्षेत्रातील आगामी संधी यावर प्रकाश टाकला.

रोहित बावस्कर यांनी अण्णासाहेब आर्थिक विकास महामंडळाच्या योजनांबद्दल विस्ताराने सांगितले. अक्षय ठोकळ यांनी व्यावसायिक क्षेत्रातील चढ-उतार आणि संघर्षाबाबत विवेचन करताना आधुनिक काळात किमान भांडवल गुंतवणुकीतून उभारण्यात येणाऱ्या उद्योगांबाबत माहिती दिली. नेत्रदीप चौधरी यांनी शासनाच्या विविध योजनांची तपशीलवार माहिती देऊन तरुणांना लाभ घेण्याचे आवाहन केले. विजय देशमुख यांनी आपले विचार मांडताना व्यावसायिकाच्या परिवाराची जबाबदारी अधोरेखित केली. कार्यक्रमाच्या शेवटी अकोला चमूचे मार्गदर्शक डॉ. स्वप्नील गावंडे, डॉ. हेमंत हिंगणे, प्रकाश देशमुख, प्रसाद देशमुख, विशाल तायडे, सुशिल देशमुख, रोशन काळे, शुभम बदरखे, सतीश लहुळकर यांना उल्लेखनीय कार्याबद्दल सन्मानित करण्यात आले.
९० नोंदणीकृत लाभार्थ्यांनी या कार्यक्रमाचा लाभ घेतला, कार्यक्रमास मुंबई, नागपूर, वर्धा अमरावती येथील व्यावसायिक उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुशिल देशमुख यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रकाश देशमुख, डॉ. स्वप्नील गावंडे, डॉ. मदन महल्ले, डॉ. हेमंत हिंगणे, प्रसाद देशमुख, विशाल तायडे, रोशन काळे, शुभम बदरखे, सतीश लहुळकर, वैभव गायकवाड, पीयूष देशमुख यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमासाठी काळे कॅटरर्स यांनी विशेष सहकार्य केले.

error: Content is protected !!