नागपूर : दक्षिण नागपुरातील बेलतरोडी परिसरातील महाकाली नगर झोपडपट्टी परिसरात भीषण आग लागली.२० ते २५ सिलेंडर भीषण स्फोट झाले. अग्निशमन दलाच्या १० गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या व त्यांनी आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू केले.
नागपुरातील बेलतरोडी भागात सुमारे २५ सिलिंडरचा भीषण स्फोट. अनेक झोपडपट्ट्या जळुन खाक.@vrNagpur #Nagpur #Maharashtra pic.twitter.com/0Im7xwoWzr
— Navswaraj (@navswaraj) May 9, 2022
सिलिंडर गळतीमुळे आग लागल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवला जात आहे. येथील प्रत्यक्षदर्शींनी अनेक सिलेंडरचे स्फोट झाल्याचे स्पष्ट केले. या आगीत महाकाली झोपडपट्टीमधील अनेक घर जळून खाक झाली. आगीत आतापर्यत सुमारे ६० ते ७० झोपड्या जळून खाक झाल्याची माहिती आहे. बेलतरोडी पोलिस ठाण्याच्या मागील भागात वनविभागाच्या जागेवर वसलेल्या झोपडपट्टीतील एका घरात सकाळी १० वाजताच्या सुमारास सिलेंडरला आग लागली. त्यात पाहता पाहता झोपडी जळून खाक झाली. ही आग आजूबाजूच्या झोपड्यांमध्ये पसरली. एका मागोमाग एक सोळा सिलेंडरचे स्फोट झाले. या झोपडट्टीत सुमारे १०० घरे असल्याचे समजते. आग लागताच झोपडपट्टीतील लोकांनी हाती लागेल ते सामान घेऊन सुरक्षित स्थळी जाण्यास सुरूवात केली.
दक्षिण नागपुरातील महाकाली झोपडपट्टी भागात आगीमुळे हाहा:कार@vrNagpur #Nagpur #Maharashtra pic.twitter.com/p2SpOInI1B
— Navswaraj (@navswaraj) May 9, 2022