Home » महावितरणने तक्रार निवारण न केल्यास मोर्चा नेणार : मंजूषा शेळके

महावितरणने तक्रार निवारण न केल्यास मोर्चा नेणार : मंजूषा शेळके

by Navswaraj
0 comment

अकोला : संपूर्ण जुन महिन्यात दडी मारून बसलेल्या पावसाने ५ जुलैला हजेरी लावली, सोसाट्याचा वारा वा वीजांचा गडगडाट नव्हता, भिमनगर रोहित्रात बिघाड निर्माण झाल्यामुळे अगरवेस, गुलजारपूरा, भिमनगर भागाला नेहमीप्रमाणे पाच तास अंधारात रहावे लागले, काही भागात वीज पुरवठा सुरू होता. ६ जुलैच्या पहाटे पाच वाजे पासून सकाळी सव्वादहा वाजेपर्यंत ग्राहकांना कमी भाराचा सामना करावा लागला. या भागात दिवसातून किमान ५ – ६ वेळा वीज पुरवठा खंडीत होणे, भार एकदम कमी – जास्त होणे याचे कारण कळत नाही. तक्रारी करूनही कंपनी व्यवस्थापना तर्फे ठोस कारवाई होत नसल्यामुळे वीज ग्राहक त्रस्त झाले आहेत. महावितरण कंपनीने कुठलीही पूर्वसूचना न देता जुने शहरातील अनेक ग्राहकांचे तक्रार निवारण केंद्र बदलले आहेत. नेमकी कुठल्या तक्रार निवारण केंद्रात तक्रार करावी या बद्दल ग्राहकांच्या मनात संभ्रम निर्माण झाला आहे. तक्रार देण्यासाठी हेलपाटे घ्यावे लागतात. अधिकारी फोनला प्रतिसाद देत नाही, अशी ग्राहकांची तक्रार आहे. वीजेच्या खेळखंडोबामुळे व्यवसायिक देखील त्रस्त झाले आहेत.

माजी नगरसेविका मंजूषा शेळके यांनी तक्रार निवारण केंद्र क्रमांक ९ चे सहाय्यक अभियंता यांना भ्रमणध्वनी द्वारा ग्राहकांच्या तक्रारींबाबत अवगत केले, परिस्थितीची पाहणी करून कायम स्वरुपी तोडगा काढावा अशी विनंती केली. एक-दोन दिवसात पाहणी करण्याचे आश्वासन त्यांनी दिले. जुने शहरातील वीज ग्राहकांच्या समस्यांचे निवारण न झाल्यास विद्युत भवनावर मोर्चा नेण्यात येईल असे मंजूषा शेळके यांनी नवस्वराज ला सांगितले.

तुम्हाला देखील आवडेल

error: Content is protected !!