Home » प्रेमातल्या ब्रेकअप ची मोहक कहाणी ‘मै वारी जावा’

प्रेमातल्या ब्रेकअप ची मोहक कहाणी ‘मै वारी जावा’

संजय भाकरे फाउंडेशनची 50वी एकांकिका

by Navswaraj
0 comment

नागपूर : नवीन मुला मुलींना रंगमंच उपलब्ध करून दरमहा एकांकिका चळवळीतून संधी देणार्‍या संजय भाकरे फाउंडेशनची 50 एकांकिका ‘मै वारी जावा’ चा अतिशय सुंदर प्रयोग सादर करण्यात आला.

ज्याच्यावर आपण आपल्या जिवापेक्षा जास्त प्रेम करतो, ज्याच्या छोट्याशा आनंदासाठी आपण आपला सगळ्यात मोठ्या आनंदाचा त्याग करतो, त्या व्यक्तिला आनंदी पाहण्यासाठी खूप प्रयत्न करतो, आणि ती व्यक्ति आपला विश्वास तोडून आपल्या मनाशी भावनांशी खेळतो आपल्याला फसवतो आणि सोडून जातो, तेव्हा ती वेळ दु:खदायक, वेदांनदायक असते.

आपण काय करीत नाही त्याच्यासाठी ? सर्वस्व अर्पण केले असते ? मग ते खरच प्रेम होते की केवळ गम्मत म्हणून केलेला व्यवहार होता. लेखक प्रसाद दाणी यांनी तरुणाईच्या या प्रश्नांवर समर्पक अशी संहिता लिहिली असून त्याचे अभ्यासपूर्ण दिग्दर्शन संजय भाकरे यांनी केले.

चिटणवीस सेंटरच्या अभिव्यक्ती प्रकल्प अंतर्गत ‘मै वारी जावा’ या एकांकिकेचा सुरेख प्रयोग सादर करण्यात आला. नवीन मुलांमधील एकमेकांमधील आकर्षण यालाच प्रेम समजून घेण्याचा प्रयत्न असतो. पण ते टिकविण्याची तयारी राहत नाही. त्याच्यातच तडा जातो. पण आठवणीत मन गुंतल्यामुळे त्याला थोपवणे कठीण असते. कलावंत सार्थक पांडे आणि प्रथमच रंगमंच्या वर पदार्पण करणारी संचिता पुणतांबेकर यांनी आपल्या भूमिका अतिशय समजून सादर केल्या.

संवादाची आणि अभिनयाची सशक्त परिणीती दोघांनी मजबूतपणे साकारली. प्रत्तेक तरुण मुला मुलींनी हे नाटक बघावेच इतके उत्तम सादरीकरण कलावंतांनी साकारले आहे. त्याला बाल्या लारोकर यांच्या प्रकाश योजनेतून आणि संकेत महाजन यांच्या पार्श्वसंगीताने साज चढविला होता. नेपथ्य आणि सुत्रधार शेखर मंगळमूर्ती आणि निर्मिती अनीता भाकरे यांची होती. नाटकाला रविंद्र दुरुगकर, नागपुर विद्यापीठाचे समन्वयक प्रमोद तिजारे आणि रसिकांची उपस्थिती होती.

तुम्हाला देखील आवडेल

error: Content is protected !!