Home » अकोल्याचे महेश डाबरे यांना उत्कृष्ट सेवा पुरस्कार

अकोल्याचे महेश डाबरे यांना उत्कृष्ट सेवा पुरस्कार

by Navswaraj
0 comment

अकोला : श्रीमती ल. रा. तो. वाणिज्य महाविद्यालय येथील यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठातील अभ्यास केंद्राचे केंद्र संयोजक डॉ. महेश डाबरे यांना यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या अमरावती विभागीय केंद्राद्वारे केंद्र संयोजक या संवर्गातून ‘उत्कृष्ट सेवा पुरस्कार 2022’ने सन्मानित करण्यात आले आहे.

विभागीय संचालक डॉ. संजय खडक्कार, संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ. विजयकुमार चौबे, माजी उच्च शिक्षण संचालक डॉ. के. एम. कुलकर्णी, सहयोगी संचालक प्रा. रमेश काळे यावेळी उपस्थित होते. प्र-कुलगुरू डॉ. विजयकुमार चौबे यांनी मुक्त विद्यापीठ व पारंपरिक विद्यापीठ  हे दोन्ही विद्यापिठ परस्परपूरक असल्याचे मत मांडले. अध्यक्षीय मनोगतात डॉ. संजय खडक्कार यांनी सर्वांच्या कार्याचा लेखाजोखा मांडत संबंधित कर्मचारी विद्यापीठ पुरस्कारासाठी कसे पात्र आहेत हे सांगितले. मुक्त विद्यापीठाच्या विकासात प्रत्येकाच्या योगदानाची चर्चा केली. डॉ. महेश डाबरे यांनी सत्काराला ऊत्तर देताना या संधीचे सोने करू असे नमूद केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. रमेश काळे यांनी, आभार प्रदर्शन सुनिता कानडे यांनी तर संचलन विवेक गुल्हाने यांनी केले.

तुम्हाला देखील आवडेल

error: Content is protected !!