Home » भाजपची प्रदेशची जम्बो कार्यकारिणी जाहीर

भाजपची प्रदेशची जम्बो कार्यकारिणी जाहीर

by नवस्वराज
0 comment

अकोला : भारतीय जनता पार्टीच्या नूतन प्रदेश पदाधिकाऱ्यांची घोषणा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी बुधवारी मुंबईत आयोजित एका पत्रकार परिषदेत केली. नवीन प्रदेश कार्यकारिणीत १६ उपाध्यक्ष, ५ सरचिटणीस, १६ सचिव, ६० कार्यकारिणी सदस्य, ३५० विशेष निमंत्रित सदस्यांचा समावेश आहे.

भाजपा प्रदेश कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेला प्रदेश उपाध्यक्ष माधव भंडारी, महाविजय अभियानाचे संयोजक आमदार श्रीकांत भारतीय, प्रदेश सरचिटणीस आमदार रणधीर सावरकर, अ‍ॅड. माधवी नाईक, विजय चौधरी, संजय केनेकर, विक्रांत पाटील, मुरलीधर मोहोळ , प्रदेश मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये, सहमुख्य प्रवक्ते विश्वास पाठक आदी उपस्थित होते. बावनकुळे यांनी सांगितले की, उपाध्यक्षपदी खासदार राजेंद्र गावीत, माधव भांडारी, सुरेश हाळवणकर, माजी आमदार चैनसुख संचेती, जयप्रकाश ठाकूर, अ‍ॅड. धर्मपाल मेश्राम, एजाज देशमुख आदींची नियुक्ती करण्यात आली आहे. सरचिटणीसपदी अकोल्यातील आमदार रणधीर सावरकर, अ‍ॅड. माधवी नाईक, विजय चौधरी, संजय केनेकर, विक्रांत पाटील, मुरलीधर मोहळ यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

सचिवपदी भरत पाटील, अ‍ॅड. वर्षा डहाळे, अरुण मुंडे, महेश जाधव आदींची नियुक्ती करण्यात आली आहे. कोषाध्यक्षपदी आमदार मिहिर कोटेचा, प्रदेश मुख्यालय प्रभारीपदी रवींद्र अनासपुरे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. विभागीय संघटनमंत्रिपदी उपेंद्र कोठेकर (विदर्भ ), मकरंद देशपांडे (पश्चिम महाराष्ट्र), संजय कौडगे (मराठवाडा), शैलेश दळवी (कोकण) हेमंत म्हात्रे (ठाणे) यांची नियुक्ती करण्यात आली आहे. कार्यकारिणीच्या विशेष निमंत्रित सदस्यपदी केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे, राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे, केंद्रीय व राज्य मंत्रिमंडळातील सर्व मंत्री, राज्यमंत्री, राज्यातील सर्व खासदार, आमदार यांचा समावेश आहे. याखेरीज २८८ विधानसभा मतदारसंघांचे समन्वयक आणि ७०५ मंडलांचे प्रभारीही नियुक्ती करण्यात येणार आहे, असेही बावनकुळे यांनी नमूद केले.

तुम्हाला देखील आवडेल

error: Content is protected !!