Home » पोलीस भरतीच्या वेबसाईटवर तृतीयपंथीयांसाठी पर्याय झाला उपलब्ध

पोलीस भरतीच्या वेबसाईटवर तृतीयपंथीयांसाठी पर्याय झाला उपलब्ध

by Navswaraj
0 comment

अकोला : महाराष्ट्र पोलिसांनी सोमवारी कॉन्स्टेबल आणि कॉन्स्टेबल-ड्रायव्हर्सच्या भरतीसाठी अर्जामध्ये ट्रान्सजेंडरसाठी पर्याय तयार करण्यात आला आहे. मुंबई उच्च न्यायालयाने दिलेल्या निर्देशानंतर हे पाऊल उचलण्यात आले आहे.

न्यायालयाच्या आदेशामुळे मंगळवार, 13 डिसेंबर 2022 पासून तृतीयपंथीयांना पोलिस भरतीचे अर्ज दाखल करता येणार आहे. मुंबई:महाराष्ट्र पोलिस भरतीसाठी महिला आणि पुरूष हाच पर्याय असल्याने ट्रान्सजेन्डर उमेदवारांनी महाराष्ट्र प्रशासकीय प्राधिकरणाकडे दाद मागितली होती. महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरणाने सरकारला गृह विभागांतर्गत पदांसाठीच्या अर्जामध्ये ट्रान्सजेंडरसाठी तरतूद करण्याचे निर्देश दिले होते. मात्र महाराष्ट्र सरकारने या आदेशाला मुंबई उच्च न्यायालयात आव्हान दिले होते. महाराष्ट्र सरकारने शुक्रवारी, हायकोर्टाला सांगितले की, अर्जामध्ये ‘लिंग’ श्रेणीतील ट्रान्सजेंडरसाठी तिसरा ड्रॉप डाउन समाविष्ट करण्यासाठी आपल्या ऑनलाइन वेबसाइटमध्ये बदल करण्यात येईल. तसेच पोलिस कॉन्स्टेबलची दोन पदे ट्रान्सजेंडरसाठी ठेवल्या जातील.

तुम्हाला देखील आवडेल

error: Content is protected !!