Home » ‘नासुप्र’च्या मुद्द्यावरून विधान परिषद स्थगित

‘नासुप्र’च्या मुद्द्यावरून विधान परिषद स्थगित

by Navswaraj
0 comment

नागपूर : नागपूर सुधार प्रन्यासच्या मुद्द्यावरून विधान परिषदेत सुरू असलेल्या चर्चेदरम्यान गोंधळ उडाल्याने उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी सभागृहाचे कामकाज दिवसभरासाठी तहकूब केले.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या मुद्द्यावर उत्तर देत असताना हा गोंधळ उडाला. उपसभापती डॉ. गोऱ्हे यांनी सभागृह दिवसभरासाठी तहकूब करीत असल्याची घोषणा केल्यानंतर उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी त्यावर हरकत घेतली. उद्धव ठाकरे गटाचे नेते या मुद्द्यावर सभागृहाचे कामकाज चालु नये म्हणुन दबाव आणत असल्याचे फडणवीस म्हणाले; तर फडणवीस स्वत: वकिल असल्याने त्यांनी मनाप्रमाणे बदल करून घेतल्याचा आरोप परब यांनी केली. विरोधी बाकांवरून घोषणाबाजी व गोंधळ कायम राहिल्याने उपसभापती डॉ. गोऱ्हे यांनी कामकाज तहकूब केले. आता विधान परिषदेचे कामकाज बुधवार, २१ डिसेंबर २०२२ रोजी सकाळी सुरू होणार आहे. यावेळी लक्षवेधींवर चर्चा करण्यात येईल, असे डॉ. गोऱ्हे यांनी जाहीर केले.

तुम्हाला देखील आवडेल

error: Content is protected !!