Home » मुख्यमंत्र्यांसह मंत्रिमंडळ लोकायुक्त यांच्या कक्षेत

मुख्यमंत्र्यांसह मंत्रिमंडळ लोकायुक्त यांच्या कक्षेत

by Navswaraj
0 comment

नागपूर : महाराष्ट्रात पहिल्यांदाच मुख्यमंत्र्यांसह मंत्रिमंडळ लोकायुक्तांच्या कक्षेत येणार आहे. विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाआधी आज राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वाची बैठक झाली. या बैठकीत दोन महत्त्वाचे निर्णय घेण्यात आलेत. त्यापैकी पहिल्या निर्णयाची माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.

हिवाळी अधिवेशनात लोकपाल, लोकायुक्त विधेयक मांडण्यात येणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एकत्रित पत्रकार परिषद घेतली.यावेळी देवेंद्र फडणवीस बोलत होते. भाजप-सेना युतीचे सरकार होते त्यावेळी एक समिती स्थापन केली होती. नवीन सरकार आल्यापासून आम्ही त्या समितीला चालना दिली, असे फडणवीस म्हणाले. लोकायुक्त हायकोर्ट किंवा सुप्रीम कोर्टाचे न्यायधीश या दर्जाचे असतील.

तुम्हाला देखील आवडेल

error: Content is protected !!