Home » मराठवाड्यासाठी सरकारकडुन ४५ हजार कोटींचा निधी

मराठवाड्यासाठी सरकारकडुन ४५ हजार कोटींचा निधी

by Navswaraj
0 comment

छत्रपती संभाजीनगर : मराठवाड्यासाठी महत्त्वाची असलेले राज्य मंत्रिमंडळाची बैठक मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. या बैठकीनंतर मुख्यमंत्र्यांनी दुष्काळग्रस्त मराठवाड्यासाठी 45 हजार कोटींच्या निधीची घोषणा केली आहे.

सरकारने घोषित केलेल्या निधीपैकी २७ हजार कोटी सिंचनासाठी खर्च करण्यात येणार आहे. नदीजोड प्रकल्पाला देखील 14 हजार कोटींच्या निधीला मंजुरी देण्यात आली आहे. म्हणजेच आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत 59 कोटी रुपयांच्या प्रकल्पांना मंत्रिमंडळाने मंजुरी दिली आहे. समुद्रात वाहून जाणारे पाणी गोदावरी खोऱ्यात वळवण्याच्या प्रकल्पासाठी सुमारे 14 हजार 40 कोटींची मान्यता देण्यात आली आहे. मराठवाड्यातील दूध उत्पादनाला वेग देण्याच्या प्रस्तावित योजनेसाठी 3 हजार 225 कोटींचा निधी मंजूर करण्यात आला आहे.

तुळजा भवानी मंदिर विकासासाठी 1 हजारी 385 कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत. मराठवाड्यातील एकूण 35 सिंचन प्रकल्पांना सुधारित मान्यता देण्यात आली आहे. मराठवाड्यातील ग्रामपंचायतींना इंटरनेट जोडणीसाठी 284 कोटी दिले जातील. औरंगाबाद शहराचे नाव बदलल्यानंतर आता औरंगाबाद जिल्ह्याचेही नाव देखील छत्रपती संभाजीनगर जिल्हा करण्यात आले आहे. मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनाच्या आदल्या दिवशी तसेच छत्रपती संभाजीनगरमध्ये मंत्रिमंडळ बैठक असताना राज्य सरकारच्या वतीने राजपत्र जारी करण्यात आले आहे.

error: Content is protected !!