Home » राजराजेश्वर मंदिरात शिवभक्तांनी घेतला महाप्रसादाचा आस्वाद

राजराजेश्वर मंदिरात शिवभक्तांनी घेतला महाप्रसादाचा आस्वाद

by Navswaraj
0 comment

अकोला : आंतरराष्‍ट्रीय कथाकार प्रदीप मिश्रा यांच्या शिव महापुराण कथेनिमित्त महाप्रसाद वाटपाचा कार्यक्रम सुरू करण्यता आला.

आता भगवान राजराजेश्वर यांच्या प्रेरणेने दर सोमवारी हजारो शिवभक्तांना महाप्रसादाचे वाटप मंदिर प्रांगणात केले जात आहे. श्री राजेश्वराच्या दर्शनानंतर सर्व शिवभक्तांना या महाप्रसादाचा लाभ देण्यात येत आहे. ५ मे २०२३ रोजी शिव महापुराण कथा महोत्सवापासून महाप्रसाद कार्यक्रमास सुरुवात झाली. श्री राजराजेश्वर महाराज यांच्या प्रेरणेतून या महाप्रसाद कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली आहे. शिवभक्तांच्या सहकार्याने दर सोमवारी दुपारी १२ वाजल्यापासून भगवान श्री राजराजेश्वर महाराजांची पूजा करून भाविकांना महाप्रसादाचे वाटप करण्यात येते. हे धार्मिक व पुण्यमय कार्य यशस्वी करण्यासाठी शिवभक्त यथाशक्ती प्रयत्न करीत आहेत.

तुम्हाला देखील आवडेल

error: Content is protected !!