Home » महावितरणच्या अकोला येथील विद्युत भवनासमोर आंदोलन

महावितरणच्या अकोला येथील विद्युत भवनासमोर आंदोलन

by Navswaraj
0 comment

अकोला : महाविरतणमधील कनिष्ठ  कार्यालयीन सहाय्यकां बाबत काढण्यात आलेल्या  परिपत्रकाला मागे घेण्याच्या मागणीसाठी महावितरणच्या अकोला येथील विद्युत भवनासमोर सोमवार, १२ सप्टेंबर २०२२ रोजी आंदोलन करण्यात आले.

महाराष्ट्र वीज कामगार महासंघाचे राज्य सचिव अनिल माहोरे, नागपूर प्रादेशिक अध्यक्ष गणेश भंडारी, अकोला झोनचे सचिव श्री विनोद फुलारी, सहसचिव संतोष माहोकार, अकोला सर्कलचे सचिव विकास कोकाटे, अकोला सर्कल अध्यक्ष नरेंद्र औतकर यांनी यावेळी आयोजित निषेध सभेला संबोधित केले.

सभेनंतर संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी महावितणच्या मुख्य अभियंत्यांना निवेदन देत परिपत्रक मागे घेण्याची मागणी केली. आंदोलनात स्वप्नील भागवत, गणेश लहरिया, अविनाश भोलणकर, शुभम बारड, दीपक धोत्रे, नेहा विखोरे, शिवानी अग्रवाल, इंद्रायणी पराते, प्रतिज्ञा इंगोले, उषा धोट आदींनी सहभाग घेतला. कंत्राटी बाह्यस्तोत्र निलेश बोरसे, नितीन शर्मा, अशोक राठोड आदीही यावेळी उपस्थित होते.

तुम्हाला देखील आवडेल

error: Content is protected !!