Home » आठवड्याला तीन कोटी कमाविणारा खेळाडू वापरतो तुटलेला फोन

आठवड्याला तीन कोटी कमाविणारा खेळाडू वापरतो तुटलेला फोन

by Navswaraj
0 comment

नवी दिल्ली : फुटबॉलचे खेळाडू सर्वाधिक पैसा कमाविणारे क्रीडापटु म्हणून ओळखले जातात.  फुटबॉल लीगमध्ये खेळणारा एक प्रचंड श्रीमंत खेळाडू, तुटलेला फोन वापरायचा असे सांगितले तर तुमचा विश्वास बसणार नाही. पण, हे खरे आहे.

लिव्हरपूलच्या सादियो माने याचा लोकप्रिय स्टार फुटबॉलपटूंमध्ये समावेश होतो. त्याची कमाई दर आठवड्याला ३ कोटी ३५ लाख रुपये. फक्त क्लबच्या वेतनातून मिळणारी ही रक्कम आहे. सादियोला कोट्यवधींची कार, घर आणि आलिशान वस्तू खरेदीमध्ये रस नाही. सादियो अगदी तुटलेला फोन वापरतो. दोन ते तीन वर्षांपासून त्याच्याजवळ एकच फोन आहे. त्याला याबद्दल प्रश्नही विचारण्यात आला. त्यावर सादियो म्हणाला, ‘मी असे हजार फोन खरेदी करु शकतो. मला १० फरारी, २ जेट प्लेन आणि २० डायमंड घड्याळांची काय गरज आहे? मी खुपच गरीबी बघितलीय. शिक्षणासाठी शाळेत जाता आले नाही. म्हणूनच मी माझ्या देशात शाळा बनवल्या. जेणेकरुन मुलांना शिकता येईल. फुटबॉल स्टेडियम बांधले.’

हे सर्व सांगत असताना सादियोला त्याची एकेकाळची हलाखीची परिस्थिती आठवली. दाटलेल्या कंठाने त्याने सांगितले की, ‘एकवेळ अशी होती, जेव्हा माझ्याकडे खेळण्यासाठी बूटही नव्हते. चांगले कपडे नव्हते. आज माझ्याकडे सगळे आहे. त्याचे मी प्रदर्शन करायला पाहिजे का? माझ्याकडे जे आहे, ते मला तुमच्यासोबत वाटायचे आहे.’

तुम्हाला देखील आवडेल

error: Content is protected !!