मराठी भाषा आणि संस्कृती संवर्धनासाठी तसेच भावी पिढीच्या उद्धारासाठी मराठी साहित्य संमेलने ही काळाची गरज असून “साहित्यकारांनी आपल्या साहित्यातून समाजात शाश्वत मूल्ये रुजवावीत”असे प्रतिपादन प्रसिद्ध कथाकथनकार प्रा.आप्पासाहेब खोत यांनी केले. ते मडिलगे खुर्द ता भुदरगड येथे आयोजित राज्यस्तरीय ग्रामीण मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदावरुन बोलत होते. अक्षरसागर साहित्य मंच, शाश्वत विकास चळवळ आणि ग्रामपंचायत मडिलगे खुर्द, यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित संमेलन चार सत्रात मोठ्या उत्साहात संपन्न झाले.
साहित्यकारांनी समाजात शाश्वत मूल्ये रुजवावीत : कथाकथनकार आप्पासाहेब खोत
previous post