Home » चिमुकल्यांच्या दप्तराचे ओझे कमी करा

चिमुकल्यांच्या दप्तराचे ओझे कमी करा

by Navswaraj
0 comment

अकोला : शाळेतील पुस्तके, वह्या आणि लेटरबुकच्या वाढत्या संख्येमुळे विद्यार्थ्यांच्या दप्तरांचे वजन दिवसेंदिवस वाढते आहे. काॅन्व्हेंट मधील काही पुस्तकातील अभ्यासक्रमावर अंतिम परिक्षेत कुठलाही प्रश्न विचारण्यात येत नाही. तरी पालकांना पुस्तके विकत घ्यावी लागतात, यामुळे दप्तरांचे ओझे वाढते. दप्तरांच्या ओझ्यामुळे अनेक विद्यार्थ्यांना पाठदुखी व मणक्याचा त्रास होतो आहे.

नर्सरीच्या विद्यार्थ्यांना दप्तरांच्या ओझ्यापासून थोडा दिलासा मिळावा म्हणून महानगरातील एका इंग्रजी काॅन्व्हेंट शाळेने दप्तरांचे ओझे वाहून नेण्यासाठी तीनचाकी गाडी आणि कर्मचारी तैनात केले आहेत. शाळा व्यवस्थापनाने इतका द्राविडीप्राणायाम करण्यापेक्षा पुस्तकांची संख्या कमी करावी. जेणेकरून पालकांच्या खिशाला झळ बसणार नाही आणि चिमुकल्यांचा शारिरीक त्रास वाचेल. शिक्षण विभागाने देखील याबाबीकडे विशेष लक्ष द्यावे असे अनेक पालकांचे म्हणणे आहे.

तुम्हाला देखील आवडेल

error: Content is protected !!