Home » Amravati Wildfile : अज्ञात वाहनाच्या धडकेत अमरावतीत बिबट्याचा मृत्यू

Amravati Wildfile : अज्ञात वाहनाच्या धडकेत अमरावतीत बिबट्याचा मृत्यू

by Navswaraj
0 comment

अमरावती | Amravati: ज्ञात वाहनाच्‍या धडकेने बिबट्याचा मृत्‍यू झाला. ही घटना गुरूवारी (ता. १६) सकाळी उघडकीस आली. चांदूर रेल्‍वे मार्गावर एसआरपीएफ कॅम्‍पजवळ बिबट मृतावस्‍थेत आढळला. (Leopard found dead at Amravati hit by unknown vehicle)

अमरावती शहराच्या आसपास असलेल्या जंगलांमध्ये काही दिवसांपासून बिबट्यांचा वावर वाढला आहे. अशात शहरापासून जवळच असलेल्या एसआरपीएफ कॅम्पजवळ बिबट्या मृतावस्थेत आढळल्याने वन्यजीव प्रेमींमध्ये खळबळ उडाली. मरण पावलेला बिबट मादी असून तिचे वय अंदाजे अडीच वर्ष आहे. घटनेची माहिती मिळताच वन अधिकारी आणि कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी बिबट्याचा मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवला.

अमरावतीपासून जवळच असलेल्या पोहरा-मालखेडच्‍या जंगलात मोठ्या प्रमाणावर वृक्षतोड करण्यात येत आहे. त्‍यामुळे अनेक वन्‍यप्राणी रस्त्यांवर येत आहेत. अशातच अज्ञात वाहनाच्‍या धडकेने या बिबट्याचा मृत्‍यू झाल्‍याची शक्‍यता आहे. गलातील मानवी हस्‍तक्षेप थांबविण्‍यासाठी कठोर उपाययोजना करण्‍याची गरज असल्‍याचे मत ‘वॉर’ या वन्‍यजीव संरक्षणाच्‍या क्षेत्रातील संस्‍थेचे अध्‍यक्ष नीलेश कांचनपुरे यांनी व्‍यक्‍त केले.

तुम्हाला देखील आवडेल

error: Content is protected !!