Home » तेल्हाऱ्यात आमदारांच्या फोटोसमोर खड्ड्यात लावले दिवे

तेल्हाऱ्यात आमदारांच्या फोटोसमोर खड्ड्यात लावले दिवे

by Navswaraj
0 comment

अकोला : तेल्हारा तालुक्यातील रस्त्यांच्या  दुर्दशामुळे नागरिकांना त्रास होत आहे. निवेदने, आंदोलने करून काहीच फायदा झाला नाही. तालुक्यातील दयनीय रस्त्यांबाबत प्राशासनाचे लक्ष वेधण्यासाठी वंचित बहुजन युवा आघाडीच्या वतीने कालेगाव-तेल्हारा रस्त्याकरिता पाथर्डी ते सिरसोली रस्त्यावरील खड्ड्यात आमदारांचे उलटे छायाचित्र ठेवून त्यासमोर दिवे लावून आंदोलन करण्यात आले.

मुख्य रस्त्यासह ग्रामीण भागाला जोडणाऱ्या रस्त्यांची अवस्था गेल्या दहा वर्षांपासून अतिशय खराब झाली आहे. खराब रस्त्यांमुळे अनेक लहान-मोठे अपघात घडले असून, यामध्ये अनेक नागरिकांनी आपले प्राण गमावले असून, कित्येकांना कायमचे अपंगत्व आले आहे. रस्त्यासाठी तालुक्यात अनेक वेळा लहान-मोठी आंदोलने झाली आहेत. कालेगाव-तेल्हारा रास्ता त्वरित दुरुस्त व्हावा याकरिता वंचित बहुजन युवा आघाडीच्या वतीने सिरसोली-पाथर्डी रस्त्यावरील खड्ड्यात स्थानिक आमदारांचा उलटे छायाचित्र ठेवून त्यापुढे दिवा लावून आंदोलन केले. यावेळी वंचित बहुजन युवा आघाडीचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

तुम्हाला देखील आवडेल

error: Content is protected !!