Home » ठाकरेंवर अशी टीका झाली तर सत्तेतून बाहेर पडू : संजय गायकवाड

ठाकरेंवर अशी टीका झाली तर सत्तेतून बाहेर पडू : संजय गायकवाड

by Navswaraj
0 comment

बुलडाणा : ठाकरे परिवारावरील टीका आम्ही खपवून घेणार नाही, हे किरीट सोमय्यांनी लक्षात घ्यावे. अन्यथा आम्हाला सत्तेचीदेखील पर्वा राहणार नाही, असा इशारा शिंदे गटातील बुलडाण्याचे बंडखोर आमदार संजय गायकवाड यांनी दिला आहे.

किरीट सोमय्या यांच्या याच पोस्टनंतर शिवसेना आमदार नाराज झालेत.

माजी खासदार व भाजपाचे नेते किरीट सोमय्या यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची नुकतीच भेट घेतली होती. या भेटीचे छायाचित्र ट्विटरवर पोस्ट करताना त्यांनी उद्धव ठाकरे यांचा उल्लेख माफिया असा केला. त्यामुळे शिवसेनेतील बंडखोर आमदारांनी नाराजी व्यक्त केली. आमदार गायकवाड यांनी तर थेट प्रतिक्रियाच दिली.

गायकवाड म्हणाले की, “किरीट सोमय्यांनी असे समजायला नको की हे लोक शिवसेनेपासून वेगळे झाले आहेत किंवा वेगळा गट निर्माण केला आहे. आम्ही शिवसेनाच आहोत. बाळासाहेब ठाकरे, उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे यांच्याविषयी आमची निष्ठा संपली व त्यांना शिव्या-शाप देऊन आम्ही बाहेर पडू असा अर्थ त्यांनी मूळीच लावू नये. भाजपा-सेना म्हणून सरकार असतांना यापुढे त्यांनी अशा प्रकारे वक्तव्य करू नये. नाही तर आम्हाला सत्तेची पर्वा राहणार नाही.”

तुम्हाला देखील आवडेल

error: Content is protected !!