Home » ‘हर बोला महादेव’च्या गजराने दुमदुमले अकोला

‘हर बोला महादेव’च्या गजराने दुमदुमले अकोला

by नवस्वराज
0 comment

अकोला : श्रावण महिन्याच्या शेवटच्या सोमवारनिमित्त अकोल्यात निघालेल्या कावड यात्रेत ‘हर बोला महादेव’च्या गजराने परिसर दुमदुमला.

अकोला कावड यात्रेला शेकडो वर्षांची परंपरा आहे. श्रावण महिन्याच्या शेवटच्या सोमवारी दरवर्षी यात्रा निघते. शिवभक्त आणि मंडळ श्री राजराजेश्वराला जलाभिषेक करण्यासाठी वाघोली येथील पुर्णा नदीतून कावडीतून पाणी आणतात. कोरोनामुळे सणवार आणि सार्वजनिक उत्सव धुमधडाक्याने साजरे करता आले नाही.

कोविड महासाथ ओसरल्यानंतर प्रथमच निर्बंधमुक्त कावड उत्सव असल्याने यंदा शिवभक्ताचा उत्साह ओसंडून वहात होता. यंदाच्या कावड यात्रेत १४० पेक्षा अधिक मंडळांनी सहभाग घेतला. ‘हर हर बोला महादेव’ असा जयघोष करीत यात्रेला सुरुवात झाली. अकोल्यापासून जवळच असलेल्या गांधीग्राम (वाघोली) येथील पूर्णा नदीच्या पात्रातून पाणी कावडींमध्ये भरून घेण्यासाठी मंडळांच्या कावडधारींनी रविवार, २१ ऑगस्ट २०२२ रोजी सायंकाळपासूनच गांधीग्राम परिसरात गर्दी केली होती. खबरदारीचा उपाय म्हणून हा मार्ग दरवर्षीप्रमाणे यंदाही पोलिसांनी बंद केला होता.

पूर्णा नदीच्या पात्रातून भरलेल्या कावड घेऊन कावडधारी पायी गांधीग्रामवरून अकोल्याकडे रवाना होत होते. यंदाही डाबकी रोडवरील कावड संपूर्ण यात्रेत आकर्षणाचे केंद्र ठरली. याशिवाय महिलांच्या कावडीनेही अकोलेकरांचे लक्ष वेधले. कावडधारी शिवभक्तांचे मार्गात ठिकठिकाणी स्वागत करण्यात आले. त्यांच्यासाठी ठिकठिकाणी पाणी, सरबत, साबुदाण्याची उसळ, फराळी चिवडा, फळं, दुध, सरबत आदीची व्यवस्था करण्यात आली होती.

तुम्हाला देखील आवडेल

error: Content is protected !!