Home » काटेपूर्णा प्रकल्पातील आवक मंदावली

काटेपूर्णा प्रकल्पातील आवक मंदावली

by Navswaraj
0 comment

अकोला : मागील दहा दिवसापासून पावसाने पुन्हा विश्रांती घेतली. एकीकडे पावसाची विश्रांती तर दुसरीकडे नियमित होणारी पाण्याची उचल, यामुळे जिल्ह्यातील सर्वात मोठ्या काटेपूर्णा प्रकल्पाच्या जलसाठ्यात काही प्रमाणात घट झाली आहे.

काटेपूर्णा प्रकल्प सर्वात मोठा प्रकल्प म्हणून ओळखला जातो. प्रकल्पाची साठवण क्षमता ८६.३५ दशलक्ष घनमिटर आहे. अकोला शहर, मूर्तिजापूर, औद्योगिक वसाहत, खारपाणपट्टा आदींना या प्रकल्पातून पाणी पुरवठा केला जातो. तसेच हजारो हेक्टर जमिन सिंननाखाली आणली जाते. यावर्षी जुन महिन्यात पावसाने दांडी मारल्याने प्रकल्पाच्या जलसाठ्यात घट झाली होती. १४ जुलै रोजी काटेपूर्णा प्रकल्पात २०.४५ दलघमी जलसाठा उपलब्ध होता. मात्र १५ जुलै पासून पावसाने हजेरी लावल्याने तसेच जुलै अखेरीस जोरदार पाऊस झाल्याने विशेषत: वाशिम, मेडशी, मालेगाव परिसरात पाऊस झाल्याने प्रकल्पाच्या जलसाठ्यात लक्षणीय वाढ होवून प्रकल्पात ५४ दलघमी जलसाठा उपलब्ध झाला होता. मात्र आता पुन्हा पावसाने विश्रांती घेतल्याने प्रकल्पातील पाण्याची आवक मंदावली आहे.

तुम्हाला देखील आवडेल

error: Content is protected !!