Home » शनिवारपासून अकोल्यातून धावणार काचीगुडा-बिकानेर रेल्वे

शनिवारपासून अकोल्यातून धावणार काचीगुडा-बिकानेर रेल्वे

by Navswaraj
0 comment

अकोला : उन्हाळ्याच्या सुट्यांमुळे रेल्वेत होणारी गर्दी लक्षात घेता दक्षिण मध्य रेल्वेने काचीगुडा ते बिकानेर मार्गावर विशेष रेल्वे फेरी सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. ६ मे पासून सुरू होणारी ही विशेष रेल्वे फेरी २७ जूनपर्यंत सुरू राहणार आहे. अकोला आणि वाशीम मार्गे ही रेल्वे फेरी चालणार आहे.

नांदेड रेल्वे प्रबंधक कार्यालयाने ‘नवस्वराज’ला दिलेल्या माहितीनुसार काचीगुडा-बिकानेर विशेष साप्ताहिक रेल्वे फेरीचा क्रमांक 07053 असा राहणार आहे. दर शनिवारी रात्री साडेनऊ वाजता काचीगुडावरून ही रेल्वे निघेल व सोमवारी दुपारी दोनच्या सुमारास बिकानेरला पोहोचेल. सकाळी ०९.२० वाजता ही गाडी अकोला रेल्वे स्थानकावर पोहोचणार आहे.

बिकानेरहुन काचीगुडाला जाणाऱ्या रेल्वेचा क्रमांक 07053 राहणार आहे. दर मंगळवारी रात्री सव्वा आठ वाजता ही गाडी बिकानेरवरून निघेल व गुरुवारी सकाळी ०९.४० वाजता काचीगुडाला पोहोचेल. अकोल्यात बुधवारी रात्री ०९.२५ वाजता ही रेल्वे पोहोचेल. प्रथम, द्वितीय आणि तृतीय श्रेणी वातानुकूलित कोच, स्लीपर कोच आणि अनारक्षित कोच या विशेष साप्ताहिक रेल्वेला असतील. या गाडीचे ऑनलाईन आरक्षणही उपलब्ध राहणार आहे.

तुम्हाला देखील आवडेल

error: Content is protected !!