Home » अनिल देशमुखांच्या वकिलांना कोर्ट म्हणे, दुसरे न्यायाधीश शोधा

अनिल देशमुखांच्या वकिलांना कोर्ट म्हणे, दुसरे न्यायाधीश शोधा

by Navswaraj
0 comment

मुंबई : राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या जामीन अर्जावर सुनावणी घेण्यास न्यायमूर्ती भारती डांगरे यांनी नकार दिला आहे. आपण वैयक्तीक कारणांमुळे या प्रकरणाची सुनावणी घेऊ शकत नाही, त्यामुळे दुसऱ्या न्यायमूर्तीकडे दाद मागण्यात यावी, असे निर्देश डांगरे यांनी दिले आहेत.

आमदार अनिल देशमुख यांना ईडीच्या प्रकरणात जामीन मिळाल्यानंतर त्यांनी सीबीआयच्या प्रकारणातही दिलासा मिळावा, यासाठी उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. मात्र, त्यांच्या जामीन अर्जावर सुनावणी घेण्यास उच्च न्यायालयतील न्यायमूर्ती भारती डांगरे यांनी नकार दिला आहे. यापूर्वीही न्यायमूर्ती भारती डांगरे यांनी अनिल देशमुख यांची सुनावणी नाकारली होती.

देशमुख यांच्याशी कोणत्या तरी प्रकरणात वकील म्हणून माझा संबंध आलेला असू शकतो, त्यामुळे नैतिकता म्हणून त्यांच्या प्रकारणावर आपण सुनावणी देणे योग्य होणार नाही, असे सांगून न्यायमूर्ती डांगरे यांनी देशमुख यांच्याबाबतची सुनावणी घेण्यास स्पष्ट नकार दिला आहे. त्यामुळे देशमुख यांच्या वकिलांना आता दुसऱ्या न्यायमूर्तीकडे दाद मागावी लागणार आहे. अन्यथा हे प्रकरण उच्च न्यायालयाच्या रजिस्ट्रीकडे न्यावे लागेल.

तुम्हाला देखील आवडेल

error: Content is protected !!