Home » Mumbai News : जैश-ए-मोहम्मदच्या प्रमुख अतिरेक्याचे अपहरण

Mumbai News : जैश-ए-मोहम्मदच्या प्रमुख अतिरेक्याचे अपहरण

by नवस्वराज
0 comment

Mumbai | मुंबई : अनेक उपनावे असलेला जैश-ए-मोहम्मदचा प्रमुख दहशतवादी मोहिउद्दीन औरंगजेब आलमगिर उर्फ मकतब अमीर, मुजाहिदभाई, मुहम्मदभाई याचे पाकिस्तानातील हफिजाबादमधून अज्ञात लोकांनी अपहरण केले. अहवालानुसार एका नातेवाईकासह डेरे हाजी गुलाम येथे कौटुंबिक कार्यक्रमासाठी जात असताना अज्ञात कारस्वारकांनी अडवून जबरदस्तीने आलमगीर आणि त्याच्या नातेवाईकाला ताब्यात घेतले. या दोघांचा तसेच अपहरणकर्त्यांचा शोध लागलेला नाही. (Jaish -E -Mohammad Prime Terrorist Mohiuddin Aurangjeb Alamgir Kidnapped Alongwith His Relative At Hafizabad Pakistan)

2019 मध्ये पुलवामा येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात केंद्रीय राखीव पोलीस दलाचे (CRPF) 40 हून अधिक जवान शहीद झाले होते. या हल्ल्याचे नियोजन आणि अंमलबजावणीमध्ये मोहिउद्दीन औरंगजेब आलमगिर याची महत्त्वपूर्ण भूमिका होती. जैश संघटनेच्या निधी संकलनाच्या क्रियाकलापांवर तो लक्ष ठेवतो. निधीचा वापर अफगाण जवानांच्या घुसखोरीसाठी तसेच जम्मू-काश्मिरमध्ये भारतीय सुरक्षा दलावर हल्ले घडवण्यासाठी करण्यात येतो, असा त्याच्यावर आरोप आहे. बेकायदेशीर क्रियाकलाप (प्रतिबंध) कायदा 1967 मधील तरतुदीअन्वये भारताने आलमगिरला अधिकृतपणे दहशतवादी म्हणून घोषित केले आहे.

तुम्हाला देखील आवडेल

error: Content is protected !!