Home » फडणवीसांना रोखण्यासाठी ठाकरे-पवारांचे षडयंत्र : बावनकुळे

फडणवीसांना रोखण्यासाठी ठाकरे-पवारांचे षडयंत्र : बावनकुळे

by Navswaraj
0 comment

नागपूर : शरद पवारांनी महाराष्ट्राचा अपमान केला आहे. केवळ देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्री होण्यापासून रोखण्यासाठी उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांनी एकत्रित येत षडयंत्र केल्याचा आरोप भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी नागपुरात केला. राष्ट्रवादीचे नेते माजी मंत्री जयंत पाटील यांनी पहाटेच्या शपथविधीबाबत केलेले वक्तव्य खरे असेल तर हे मोठे षडयंत्र होते असे ते म्हणाले.

एक तर फडणवीस यांना मिळालेले बहुमत बाजूला करीत सत्ता मिळविण्याच्या कपटात शरद पवार असतील किंवा जयंत पाटील शरद पवार यांना बदनाम करीत असतील असे दिसत असल्याचे बावनकुळे म्हणाले. शरद पवारांनी शकुनीमामांचा खेळ केला असा टोलाही बावनकुळे यांनी यावेळी लगावला. शरद पवारांनी देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्री का होऊ दिले नाही याचा शोध घेण्याची गरज आता असल्याचे ते म्हणाले. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हे जबाबदार नेते आहेत. ते खोटे कसे बोलू शकतात असा प्रश्नही बावनकुळे यांनी उपस्थित केला.

कपटकारस्थान करून सरकार स्थापन केल्यानेच महाविकास आघाडीचे पानीपत झाल्याचे त्यांनी नमूद केले. पवार आणि ठाकरे यांनी बहुमताचा अवमान केल्याबद्दल महाराष्ट्राच्या जनतेची माफी मागितली पाहिजे. शरद पवार यांच्याकडे आजपर्यंत सत्तेसाठी आपली पातळी न सोडणारा नेता म्हणून पाहिले जात होते. परंतु पाटील यांच्या वक्तव्याचा विचार केल्यास यावर पुनर्विचार करण्याची वेळ आता आलीय असे बावनकुळे आक्रमकपणे म्हणाले.

तुम्हाला देखील आवडेल

error: Content is protected !!