Home » प्रगल्भ तीन पिढ्यांच्या मुलाखतींमुळे आयुष्य समृद्ध

प्रगल्भ तीन पिढ्यांच्या मुलाखतींमुळे आयुष्य समृद्ध

निवेदक सुधीर गाडगीळ यांनी गप्पांमधून उलगडा जीवनप्रवास

by Navswaraj
0 comment

नागपूर : राजकारण, समाज, अभिनय, कला, गायन, विज्ञान, क्रिडा अशा विविध क्षेत्रात उत्तूंग कामगिरी केलेल्या तिन पिढ्यांशी संवाद साधताना त्यांच्या व्यक्तिमत्वाचे पैलू अनुभवता आहे. सामान्यांमधील असामान्य व्यक्तींशीही मनमोकळ्या गप्पा मारता आल्या. या मुलाखतींमुळे माझे संपूर्ण आयुष्यच समृद्ध झाले आहे. त्यामुळे या अनुभवांचे मोल करताच येत नाही, असा दिलखुलास संवाद प्रख्यात निवेदक सुधीर गाडगीळ यांनी नागपूकरांशी साधला.

जागतिक मैत्री दिनाचे औचित्य साधून राम गणेश गडकरी प्रतिष्ठान आणि आधार बहुउद्देशीय संस्थेच्यावतीने पर्सिस्टंट येथील कवी कुलगुरू कालिदास सभागृहात सुधीर गाडगीळ यांच्या ‘मुलखावेगळी माणसं’ या खुमासदार गप्पांची खास मैफल आयोजित करण्यात आली होती. यावेळी ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते डॉ. गिरीश गांधी यांचा अमृतमहोत्सवी सत्कार आणि उद्योजक मिलिंद घारपुरे यांचा आधार मैत्री पुरस्काराने सन्मान करण्यात आला. यावेळी व्यासपीठावर पर्सिस्टंटचे समीर बेंद्रे, हेमंत काळीकर, डॉ. अविनाश रोडे प्रामुख्याने उपस्थित होते.

आपण घेतलेल्या पाच हजारांपेकक्षा अधिक मुलाखतींमधुन तीन पिढ्यातील दिग्गजांना बोलते करता आल्याचे सुरुवातीलाच नमूद करीत मैफलीचा ताबा घेत गाडगीळ यांनी थेट विषयाला हात घातला. ‘अनुभवाने, वयाने, ज्ञानाने आणि कर्तत्वाने उत्तुंग असलेल्या व्यक्तीमत्त्वांनी माझे संपूर्ण जीवनच समृद्ध केले. आशा भोसले यांची सर्वाधिक २८ वेळा,  शरद पवार यांची १७ वेळा आणि बाळासाहेब ठाकरे यांची १२ वेळा मुलाखत घेण्याचे भाग्य लाभले. मंगेशकर घराण्यामधील सर्व भावंडांची एकाच वेळी मुलाखत घेणारा मी एकमेव व्यक्ती आहे. माणसांच्या आवडी-निवडी आणि त्यांचे सच्चेपण हा कायम माझ्या कुतुहलाचा विषय राहिला आहे. त्यामुळे झुरळाला घाबरणारी धकधग गर्ल माधुरी दीक्षित खट्याळ ‘पुलं’, कोंडी करणारे दादा कोंडके यांचा हजरजबाबीपणा, खोडकर नाना, नारळीकर करांची खवय्येगिरी, ए. पी. जे. अब्दुल कलामांचे साधेपण, अमिताभ बच्चनचा परफेक्टनेस, बाबासाहेब पुरंदरेंच्या व्यासंग पासून ते अगदी अलिकडच्या काळात हातचे न राखता मनमोकळे बालणारे राज ठाकरे यांचे व्यक्तीमत्व त्यामुळेच उलगडता आले’, असे गाडगीळ यांनी नमूद केले. ज्येष्ठ साहित्यिक शुभदा फडणवीस यांनी सूत्रसंचालन केले.

पु. लं. नी मारलेली मीठी अनमोल
पु. ल. देशपांडे यांच्या आठवणींना उजाळा देताना गाडगीळ म्हणाले, मॉरीशस येथे आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर सर्वोच्च दाद देत पुलंनी जाहिरपणे मला मिठी मारली होती. आजवर मिळालेल्या पुरस्कारांमध्ये ही मीठी माझ्यासाठी सर्वांत अनमोल आहे. पु. ल. देशपांडे यांनी रेखाटलेले महात्मा गांधी यांचे एकमेव चित्र मला भेट दिले होते. तेही मी सोन्यासारखे जपून ठेवले आहे.

तुम्हाला देखील आवडेल

error: Content is protected !!