Home » इंदूर पोलिसांकडून गरीब फूड डिलिव्हरी बॉयला दुचाकी

इंदूर पोलिसांकडून गरीब फूड डिलिव्हरी बॉयला दुचाकी

by नवस्वराज
0 comment

भोापाळ : मध्य प्रदेश पोलिसांचा माणुसकीमय चेहरा समोर आला आहे. विजय नगर पोलिसांचे यामुळे कौतुक होत आहे. पोलिसांनी जय हळदे नावाच्या डिलिव्हरी बॉयसाठी दुचाकी भेट दिली आहे. जय हळदे हा मालवीय नगर, इंदूर येथे राहतो. सायकलवर काम केल्यामुळे दिवसाला केवळ 200 ते 300 रुपये कमावता येत असल्याचे त्यांनी सांगितले. त्याने विजय नगर पोलिस स्टेशन प्रभारींना सांगितले की त्याची आई जेवण बनवायला जाते आणि वडील दुसऱ्या शहरात काम करतात. घरची आर्थिक परिस्थिती हलाखीची असल्याने तो काबाडकष्टही करतो. मोटारसायकल मिळाल्याबद्दल त्याने पोलिसांचे आभार व्यक्त केले


विजय झोमॅटो ऑनलाइन फूड डिलिव्हरी कंपनीमध्ये काम करतो. सायकलवरून अन्न पोहोचविणारा २२ वर्षांचा मुलगा प्रवास करताना पोलिसांना दिसला. त्याचा त्रास पाहून पोलिसांनी त्याला आर्थिक मदत करून मोटारसायकल मिळवून दिली. देणगी गोळा करून गिफ्ट बाईक मिळाल्याने विजयचे डोळेही पाणावले. विजय नगर पोलिस स्टेशनचे प्रभारी तहजीब काझी यांनी सांगितले की, नुकत्याच रात्रीच्या गस्तीदरम्यान, त्यांनी जय हळदे नावाच्या घामाघूम झोमॅटो डिलिव्हरी बॉयला फूड पार्सल घेऊन जाताना पाहिले होते. त्यांच्याशी बोलले असता कळले की, तो आर्थिक अडचणीत असलेल्या कुटुंबातील असून त्याच्याकडे मोटारसायकल घेण्यासाठी पैसे नाहीत. या मुलाला पोलिस ठाण्यातून दुचाकी भेट देण्यात आली.

error: Content is protected !!