Home » अख्ख्यात जगात भारताने चीनलाही मागे टाकले

अख्ख्यात जगात भारताने चीनलाही मागे टाकले

by Navswaraj
0 comment

नवी दिल्ली : भारताने चीनला मागे टाकले आहे. युनायटेड नेशन्स पॉप्युलेशन फंडाच्या (यूएनएफपीए) डाटामध्ये महत्त्वाची माहिती समोर आली आहे. त्यामुळे भारत आता आणखी एका बाबतीत अव्वल स्थानी आला आहे. हे स्थान आहे लोकसंख्येच्या बाबतीत. होय! भारताने चीनला लोकसंख्येच्या बाबतीत मागे टाकले आहे.

भारताने चीनला मागे टाकून १४२.८६ कोटी लोकसंख्येसह जगातील सर्वाधिक लोकसंख्या असलेला देश बनला आहे. यूएनएफपीएने तशी घोषणा केली आहे. सध्या चीनची लोकसंख्या १४३.५७ कोटी आहे. ‘द स्टेट ऑफ वर्ल्ड पॉप्युलेशन रिपोर्ट, २०२३’ हा अहवाल प्रसिद्ध केला. त्यात भारताला अव्वल स्थानी दर्शविण्यात आले आहे. १९५० पासून जेव्हा संयुक्त राष्ट्रांनी लोकसंख्येचा डेटा गोळा करणे आणि प्रसिद्ध करणे सुरू केले तेव्हापासून भारताच्या लोकसंख्येने चीनला मागे टाकण्याची ही पहिलीच वेळ आहे.

यूएनएफपीएच्या भारतातील २५ टक्के लोकसंख्या ० ते १४ वयोगटातील आहे. १८ टक्के लोक १० ते १९ वयोगटातील. २६ टक्के लोक १० ते २४ वयोगटातील आहेत. ६८ टक्के लोक १५ ते ६४ वर्षे वयोगटातील आणि ६५ वर्षांवरील लोक हे ७ टक्के आहेत. चीनमध्ये १७ टक्के लोक हे ० ते १४ वर्षे वयोगटातील आहेत. १२ टक्के लोक हे १० ते १९ वयोगटातील आहेत. १८ टक्के लोक हे १० ते २४ वर्षे वयोगटातील आहेत. ६९ टक्के लोक हे १५ ते ६४ वर्षे वयोगट आणि १४ टक्के लोक ६५ वर्षांच्या दरम्यान आहेत.

तुम्हाला देखील आवडेल

error: Content is protected !!