Home » मराठा आरक्षणासाठी अकोल्यातही बेमुदत अन्नत्याग आंदोलन

मराठा आरक्षणासाठी अकोल्यातही बेमुदत अन्नत्याग आंदोलन

by Navswaraj
0 comment

अकोला : मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी बेमुदत उपोषण करणाऱ्या मनोज जरांगे पाटील यांना पाठिंबा देण्यासाठी अकोल्यातील गजानन हरणे यांनी जिल्हाधिकारी कार्यालयापुढं बेमुदत अन्नत्याग आंदोलन सुरू केलय.

अकोला जिल्ह्यातील चरणगाव येथे पुढाऱ्यांना गावबंदी केल्यानंतर मराठा समाजाने अकोल्यात अधिक आक्रमक भूमिका घेतलीय. मंत्र्यांना जिल्हाबंदी तर पुढाऱ्यांना गावबंदी करण्यात आलीय. कोणत्याही नेत्याने जिल्ह्यात कुठेही राजकीय कार्यक्रम, सभा, संमेलन घेतल्यास असे कार्यक्रम उधळुन लावण्याचा ईशारा मराठा समाजाने दिलाय. अशात गजानन हरणे यांनी जिल्हाधिकारी कार्यालयापुढं अन्नत्याग आंदोलन सुरू केलय.

हरणे यांच्या उपोषण मंडपाला मराठा समाजील विविध सामाजिक कार्यकर्ते व संघटनांच्या प्रतिनिधींनी भेट दिली. मराठा आरक्षण मिळेपर्यंत आंदोलन कायम ठेवणार असल्याचं हरणे यांनी यावेळी सांगितलं. गजानन हरणे यांनी २०१९ मध्ये अपक्ष उमेदवार म्हणुन अकोला लोकसभेची निवडणूक लढविली होती. सध्या ते आम आदमी पार्टीत कार्यरत आहेत. परंतु हे अन्नत्याग आंदोलन समाजासाठी असल्याचे व राजकारणाशी संबंध नसल्याचे ते म्हणाले.

तुम्हाला देखील आवडेल

error: Content is protected !!