Home » सात लाख रुपयांपर्यंतचे उत्पन्न आता होणार करमुक्त

सात लाख रुपयांपर्यंतचे उत्पन्न आता होणार करमुक्त

by Navswaraj
0 comment

नवी दिल्ली : सात लाखांपर्यंतच्या उत्पन्नावर आता कोणताही टॅक्स लागणार नाही. टॅक्स स्लॅबही ६ वरून घटून ५ झाल्याची घोषणा अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी केली. अर्थमंत्री निर्मला सीतारामन या आपला पाचवा आणि देशाचा ७५वा अर्थसंकल्प सादर केला.

रेल्वेसाठी २.४० लाख कोटी रुपयांचे बजेट देण्यात आले आहे. भारतीय अर्थव्यवस्था योग्य मार्गावर आहे आणि उज्ज्वल भविष्याकडे वाटचाल करत आहे, असे अर्थमंत्री म्हणाल्या. प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजना एक वर्षासाठी वाढवण्यात आली. दरडोई उत्पन्न दुपटीने वाढून १.९७ लाख झाले आहे. जागतिक मंदीतही आमचा विकास दर सात टक्के राहिला आहे. व्यवसायांसाठी, सर्व डिजिटल प्रणालींसाठी पॅन क्रमांकाचा वापर पुरेसा असेल. अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी अर्थसंकल्पाचे सात आधार सांगितले. त्यांना सप्तर्षी म्हणतात. सर्वसमावेशक वाढ, वंचितांना प्राधान्य, पायाभूत सुविधा आणि गुंतवणूक, क्षमता विस्तार, हरित वाढ, युवा शक्ती, आर्थिक क्षेत्र यांचा यात समावेश असेल.

तुम्हाला देखील आवडेल

error: Content is protected !!