Home » श्री राधाकृष्ण वेद विद्यालयाचे उद‌्घाटन

श्री राधाकृष्ण वेद विद्यालयाचे उद‌्घाटन

by Navswaraj
0 comment

अकोला : आदिनाथ शक्तीपीठ श्रीकृष्णमूर्ती धर्म विकास संस्थान ट्रस्टद्वारा संचालित परमपूज्य श्री राधाकृष्ण वेद विद्यालयाचे थाटात उद‌्घाटन करण्यात आले. आमदार गोवर्धन शर्मा यांच्या शुभहस्ते या वेद विद्यालयाचे लोकार्पण करण्यात आले. विद्यार्थ्यांना वैदिक शिक्षण या वेद विद्यालयाच्या माध्यमातून देण्यात येणार आहे.

लोकार्पण सोहळ्याला डॉ. उदय ताकवाले, प्रविण पुरवार, वेद विद्यालयाचे प्रधान आचार्य वेदमूर्ती सुपेश शास्त्री जोशी, गुरुकुलाचे अध्यक्ष ज्योतिष्य प्रवीण दत्तात्रय जोशी, उप आचार्य वेदमूर्ती अभिषेक जोशी, रुपेश कुलकर्णी, वैष्णव राजवैद्य, गुरुकुल उपाध्यक्ष प्रवीण चोपडे, सचिव रमेश अलकरी, व्यवस्थापक मनीष कडुस्कर, कोषाध्यक्ष मेघा खानझोडे, अॅड. आनंद जोशी, अॅड. किरण खोत, अॅड. अजिंक्य अलकरी, प्रतुल हातवळणे, संजय सोनटक्के, शशिकांत चोपडे, गोपाल जोशी, आनंद सुरळीकर, गणेश जोशी उपस्थित होते.

वेदांचा सर्वत्र प्रचार व प्रसार व्हावा, यासाठी गुरुकुल पद्धती पूर्वी अस्तित्वात होती. मात्र कालांतराने गुरुकुल पद्धत लयास गेल्याचे पहायला मिळते. श्री राधाकृष्ण वेद विद्यालयाच्या माध्यमातून ही गुरुकुल पद्धती पश्चिम विदर्भात पुन्हा पुनरुज्जीवीत करण्याचा मानस असल्याचे मत गुरुकुलचे अध्यक्ष दत्तात्रय जोशी यांनी यानिमित्ताने व्यक्त केले. वेदांमध्ये अनेक समस्यांचे निराकरण करण्याची क्षमता आहे. वेदांचा योग्य पद्धतीने शास्त्रशुद्ध अभ्यास केला तर अनेक मानवी समस्यांवर मात करता येऊ शकेल असे प्रधान आचार्य सुपेश जोशी यावेळी म्हणाले. आमदार गोवर्धन शर्मा यांनी या उपक्रमासाठी गुरुकुलच्या सभासदांना शुभेच्छा दिल्या.

तुम्हाला देखील आवडेल

error: Content is protected !!