Home » मूर्तिजापूरमध्ये हफ्ता मागणाऱ्या गुन्हेगाराला फळ विक्रेत्याने संपवलं

मूर्तिजापूरमध्ये हफ्ता मागणाऱ्या गुन्हेगाराला फळ विक्रेत्याने संपवलं

by Navswaraj
0 comment

अकोला : रस्त्यावरील भाजीपाला तसेच फ्रुट विक्रेत्यांकडून हफ्ता मागणाऱ्या एका सराईत गुन्हेगाराला चाकू भोकसून संपवल्याची घटना घडली आहे. जिल्ह्यातील मूर्तिजापूर शहरात भरवस्तीत घडलेल्या या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. सुरेश महादेव देशमुख (वय ५५) असं मृत व्यक्तीचं नाव असून तो हत्येच्या गुन्ह्यातून नुकताच तरूंगातून बाहेर आला होता.

मृतकाच्या त्रासाला कंटाळून या फ्रूट विक्रेत्यानं त्याला कायमचं संपवल्याचं बोलल्या जात आहे. परंतु देशमुख याची हत्या झाल्याची समजताच काहींनी पेढे वाटून आनंद लुटला. मूर्तिजापूर शहरातील भगतसिंग चौकातील फळविक्रेत्यांसह भाजीपाला दुकान लावण्यावरून तसेच पैसे आणि फळांची मागणीकरून सुरेश महादेव देशमुख हा त्रास द्यायचा.

तुम्हाला देखील आवडेल

error: Content is protected !!