Home » आयएमएने जारी केला अलर्ट; भारतात कोरोनाचा उद्रेक होण्याचा धोका

आयएमएने जारी केला अलर्ट; भारतात कोरोनाचा उद्रेक होण्याचा धोका

by नवस्वराज
0 comment

नवी दिल्ली : इंडियन मेडिकल असोसिएशनने भारतासाठी अलर्ट जारी केला आहे. सर्वांनी कोरोना नियमांचे पालन करावे असे आवाहन आयएमएचे डॉ. जयेश लेले यांनी प्रसार माध्यमाशी बोलताना केले. अनेक देशांमध्ये अचानक कोविड-19 च्या वाढत्या प्रादुर्भावाने पुन्हा हाहा:कार उडाला आहे.

गेल्या 24 तासांत भारतात 145 नवीन प्रकरणे नोंदली गेली आहेत, त्यापैकी चार प्रकरणे ही नवीन चीनी विषाणू प्रकार BF.7 आहेत. डॉ. लेले म्हणाले, “आम्ही सरकारला आवाहन करतो की 2021 मध्ये दिसल्याप्रमाणे कोणत्याही परिस्थितीसाठी सज्जता वाढवावी. संबंधित मंत्रालये आणि विभागांना आपत्कालीन औषध, ऑक्सिजन पुरवठा आणि रुग्णवाहिका पुरवठा उपलब्ध करून देण्याच्या सूचना आताच जारी करावी.”भारतातील परिस्थिती सध्या चिंताजनक नाही. पण आयएमए आठ मुद्द्यांचा सल्लाही जारी करीत आहे. यात सार्वजनिक ठिकाणी फेस मास्क, सामाजिक अंतर, नियमित हात धुणे, सार्वजनिक मेळावे टाळणे, आंतरराष्ट्रीय प्रवास टाळणे, संसर्ग झाल्यास डॉक्टरांचा सल्ला घेणे, सावधगिरीचे डोस घेणे आणि सरकारच्या कोविडविषयक सुचनांचे पालन करणे या बाबी समाविष्ट आहेत.

तुम्हाला देखील आवडेल

error: Content is protected !!