Home » मराठा आरक्षण नाही तर अकोल्यात एकही राजकीय कार्यक्रम नाही.

मराठा आरक्षण नाही तर अकोल्यात एकही राजकीय कार्यक्रम नाही.

by Navswaraj
0 comment

अकोला : मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षण या मुद्द्यावर दुसऱ्यांदा उपोषण सुरू केल्यानंतर आता विदर्भातील कानाकोपऱ्यातही या आंदोलनाचे पडसाद उमटत आहेत. रविवारी (ता. २९) मराठा समाजाच्या आंदोलनाची पुढील दिशा ठरविण्यासाठी जिल्हा परिषद विश्रामगृहात बैठक घेण्यात आली. मराठा महासंघाचे अध्यक्ष विनायक पवार, कृष्णा अंधारे, मराठा सेवा संघाचे माजी जिल्हा सचिव प्रदीप चोरे, आकाश दांदळे, राखी पेटकर, चरणगावचे सरपंच श्रीकांत देशमुख, राजेश देशमुख, सुनिल देशमुख, प्रकाश भिकनकळे, दिगंबर महल्ले, धनंजय दांदळे यांनी बैठकीत आंदोलनाची दिशा ठरविली.

सोमवारी (ता. ३०) जिल्हाधिकारी कार्यालयापुढं आंदोलन करण्यात येईल. मनोज जरांगे यांना वैद्यकीय सुविधा व झेड प्लस सुरक्षा देण्याची मागणी केली जाईल. गुरुवारी (ता. २ नोव्हेंबर) जिल्ह्यातील सर्व लोकप्रतिनिधींच्या घरापुढं आत्मक्लेश आंदोलन केलं जाणार आहे. मंत्री व सर्व पक्षीय राजकीय पुढाऱ्यांना गावबंदी असेल. कोणत्याही मंत्र्यानं, राजकीय पक्षानं अकोला जिल्ह्यात कुठेही कोणतीही सभा किंवा कार्यक्रम घेण्याचा प्रयत्न करू नये. तसे केल्यास सभा व कार्यक्रम उधळुन लावण्यात येईल, असा ईशाराही बैठकीत देण्यात आला. सध्या अकोला जिल्ह्यातील चरणगाव येथे राजकीय पुढाऱ्यांना प्रवेश बंदी करण्यात आली आहे. गावबंदीची व्यापकता आता वाढविण्यात येणार आहे. त्यामुळं नेत्यांना जिल्ह्यात वावरतानाही खबरदारी घ्यावी लागणार आहे.

तुम्हाला देखील आवडेल

error: Content is protected !!