Home » दमदार पाऊस न झाल्यास, पाणी टंचाईचा सामना करावा लागेल

दमदार पाऊस न झाल्यास, पाणी टंचाईचा सामना करावा लागेल

by Navswaraj
0 comment

अकोला :  जिल्ह्यात दोन मोठे वान प्रकल्प आहेत, काटेपुर्णा आणी वान. काटेपुर्णात २०. ५२ दलघमी तर वान मधे २७. ९१ ईतका जलसाठा शिल्लक आहे. अन्य मध्यम आणी लहान प्रकल्पांची परिस्थिती गंभीर आहे. अकोला, वाशिम जिल्ह्यात तसेच प्रकल्पांच्या पाणलोट क्षेत्रात दमदार पाऊस न झाल्यामुळे, बाष्पीभवन व दररोज होणारी पाण्याची उचल यामुळे अकोला जिल्ह्याला भविष्यात पाणी संकटाचा सामना करावा लागू शकतो.

काटेपुर्णा प्रकल्पातून अकोला महानगर, औद्योगिक वसाहत, ६४ खेडी पाणीपुरवठा योजना व मुर्तीजापूर शहराला पाणी पुरवठा होतो. वान मधून तेल्हारा, अकोट, शेगाव शहर तसेच जळगाव जामोद १४० खेडी, गजानन महाराज संस्थान ८४ खेडी आदी योजनांना पाणी पुरवठा केला जातो. या व्यतिरीक्त दोन्ही प्रकल्पातून हजारो हेक्टर जमीन सिंचनाखाली येते.

मागील वर्षी दमदार पाऊस झाल्यामुळे मोठे, मध्यम व लघू प्रकल्प ओसंडून वाहीले. मोठ्या प्रकल्पांचे दरवाजे वारंवार उघडावे लागले होते. मात्र यावर्षी पावसाने दडी मारल्याने पिण्याच्या पाण्यासाठी प्रकल्पांवर अवलंबून असलेले नागरिक तसेच कास्तकार चिंतातूर झाले आहेत. पावसाचा अंदाज वर्तवणार्या वेधशाळा व तज्ञ चुकीचे ठरले आहेत. पेरण्या लांबणीवर पडल्या आहेत.

काटेपुर्णा प्रकल्पाचा मृतसाठा ११ दशलक्ष घनमीटर आहे, परंतु ६ दशलक्ष घनमीटर गाळ असल्यामुळे, केवळ ५ दशलक्ष घनमीटर पाण्याची उचल करता येते. जुलै महिन्यात पावसाची परिस्थिती अशीच राहील्यास, भीषण पाणी टंचाईला सामोरे जावे लागेल.

पाणीपुरवठा करणार्या जलवाहिन्या वारंवार फुटतात यामुळे त्यामुळे पाण्याची प्रचंड नासाडी होते. अवैध नळजोडण्या, तोट्या नसलेले धोधो वाहणारे सार्वजनिक नळस्टॅंड याकडे प्रशासनाने गंभीरपणे लक्ष देणे गरजेचे आहे. अन्यथा वर्ष २००५ ची पुनरावृत्ती होऊ शकते.

error: Content is protected !!